आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमेश कदम यांना जालन्यात अाणणे त्रासदायक; सुनावण्या अाता व्हीसीद्वारे होण्याचे संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहाराच्या येथील प्रकरणाशी संबंधित असलेले आमदार रमेश कदम यांना जालन्यात सुनावणीला आणणे त्रासदायक ठरत आहे. तसेच पोलिसांशी त्यांची वर्तणूक असभ्य असल्याचेही पोलिसांकडून सांगितले जाते. दरम्यान, यापूर्वी ४ एप्रिल २०१६ रोजी जालन्यात सुनावणीसाठी आलेले कदम यांची १२ डिसेंबर रोजी दोषारोपपत्राआधारे सुनावणीसाठी २२ डिसेंबर ही तारीख मागितली असून, यानंतरच्या सुनावण्या व्हीसीद्वारेच होणार असल्याचे संकेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.   


अण्णाभाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल आहे. या तक्रारीनुसार ४ एप्रिल २०१६ रोजी सुनावणी झाली होती. यानंतर दोषारोपपत्रानुसार सुनावणीसाठी पुढील तारीख वाढवून घेण्यात आली आहे. आमदार कदम यांच्यासाठी लागणारा बंदोबस्त, त्यांचा ताफा यामुळे पोलिसांसाठी हे त्रासदायक ठरत आहे. 
 

पोलिसांना काय त्रास   
 आमदार रमेश कदम यांना ठाणे येथून आणण्या-नेण्यासाठी पोलिसांना एक दिवस अगोदरपासूनच तयारी करावी लागते. ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेच्या वेळेच्या आतच त्यांना आणून जालन्यातील कुठल्या तरी पोलिस ठाण्यात ठेवावे लागते. यात ताणही पडतो. 

बातम्या आणखी आहेत...