आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीच्या बहाण्याने परळीच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; अंबाजोगाईतील धक्कादायक घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- सतत आत्महत्येच्या धमक्या देत जबरदस्तीने 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस मैत्री करण्यास भाग पाडून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका महाविद्यालयीन तरुणावर अंबाजोगाई शहर पोलिस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला.

 

पीडिता परळी येथील रहिवासी आहे. तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, सन 2017 मध्ये तिने अंबाजोगाई येथील एका तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. अन्य तीन मैत्रिणींसोबत ती महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कॉलेजच्या कँटीनमध्ये एका मैत्रिणीने तिची प्रेमजीत सज्जन माने (रा.चाडगाव,ता.रेणापूर,जि.लातूर) याच्यासोबत ओळख करून दिली. प्रेमजीत माने हा सध्या शिक्षणासाठी अंबाजोगाई येथीलच एका महाविद्यालयात असल्याने तो भाड्याने  खोली करून राहतो.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...मैत्रिणीकडून पीडितेचा मोबाइल नंबर मिळविला, अन्...

बातम्या आणखी आहेत...