आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ जयंतीला जन्मलेल्या 17 मुलींना आमदार विनायक मेटेंकडून सरप्राईज गिफ्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- शहरात काल (शुक्रवार) राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असतांना शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी रात्री साडेनऊ वाजता जिल्हा रूग्णालयाला अचानक  भेट दिली. जयंतीला मुलींना जन्म देणाऱ्या  मातांचा साडीचोळी भेट देवून सत्कार तर बाळाला खेळणी देण्यात आली. जन्माचे स्वागत मिठाईचे वाटप करून करण्यात आले. कुठलाही गाजावाजा न करता आमदार मेटे यांनी हे ‘सरप्राईज गिफ्ट’ दिल्याने नातेवाईक भारावून गेले.

 

12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात येते. जिजाऊंनी ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले. संस्कारीत केले.  स्वराज्याची निर्मिती करण्यासाठी शिवरायांना  विचार दिले. अगदी त्याच प्रमाणे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने या दिवशी जन्म घेणाऱ्या लेकींचे स्वागत झाले पाहीजे. जिजाऊंचा विचार घेवुन या मुली पुढे चालतील ही संकल्पना घेवुन शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी जयंती दिनी रात्री साडेनऊ वाजता जिल्हा रुग्णालयासह खासगी दवाखान्यात  शुक्रवारी  मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा अचानक निर्णय घेतला. आमदार मेटे यांनी 17 मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यात  केले. जिल्हा रूग्णालयात कन्येला जन्म देणाऱ्या  मातांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केल्यांनतर त्यांची अस्थेवाईकपणे चौकशी  करण्यात आली त्यांनतर त्यांना साडीचोळी भेट देण्यात आली तर मुलीला खेळणी आणण्यात आली होती. मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी  आणलेली मिठाई  पाहुन नातेवाईकही भारावून गेले होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा जयश्री मस्के, पंचायत समिती सभापती मनीषा कोकाटे, केज पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली मेटे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जि.प. सदस्य भारत काळे, सुहास पाटील, अनिल घुमरे, रामहरी मेटे, राजेंद्र बहीर, सचिन कोटुळे, डॉ. राजेंद्र बंड, विनोद कवडे, बबन माने आदी उपस्थित होते.

 

प्रत्येक जयंतीला मुलींच्या जन्माचे स्वागत
राजमाता जिजाऊ यांच्या प्रत्येक जयंतीला बीडमध्ये मुलींच्या जन्माच्या स्वागताचा हा कार्यक्रम अखंडीतपणे सुरू राहणार असुन या शिवाय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर, लोकनेत्या केशरकाकु क्षीरसागर यांच्या जयंती दिनीही अशाच प्रकारे स्त्री जन्माचे स्वागत करण्यात येणार आहे.

- विनायक मेटे, आमदार, शिवसंग्राम

 

जिल्हा शल्य चिकित्सकांचाही केला सत्कार
सुरक्षीत मातृत्व अभियानात बीड जिल्हा पहिला आला असुन शासकीय रूग्णालयात होणाऱ्या प्रसुतीत बीड राज्यात पहिले आल्याने आमदार विनायक मेटे यांनी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.अशोक थोरात यांचा पेढा भरवून स्वागत केले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

 

 

बातम्या आणखी आहेत...