आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Parbhani: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निषेध..मनसेचे मोटारसायकल आत्महत्या आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- वाढती महागाई आणि पेट्रोल-डिझेल दरवाढीचा महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेकडून निषेध करण्यात आला.  पेट्रोल-डिझेलची दरवाढ लक्षात घेता शेतकर्‍यांप्रमाणेच वाहनधारकांनाही आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीती मनसेने व्यक्त केली आहे.

 

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज (बुधवार) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोटारसायकल आत्महत्या आंदोलन केले. दिवसेंदिवस पेट्रोल,डिझेल व गॅसच्या दरात मोठी वाढ होत आहे. परिणामी सर्वसामान्य जनता या महागाईत होरपळून निघत आहे. पेट्रोलचे भाव शहरात सातत्याने विक्रमीच राहिले आहे. मंगळवारी तब्बल 86 रुपये प्रतिलिटरचा भाव राहिला.

 

महाराष्ट्रात नव्हे तर देशातही हा भाव विक्रमी नोंदविला गेला आहे. डिझेलचे दरही 72 रुपयांवर पोहोचले आहेत. घरगुती गॅसही 800 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविणार्‍या या सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. भविष्यात ही दरवाढ कमी झाली नाही तर शेतकर्‍यांप्रमाणेच मोटारसायकल धारकांच्या व घरगुती गॅससाठी गृ‍हिणीच्या आत्महत्या होतील, अशी भीतीने मनसेने व्यक्त केली. केंद्र सरकारने तातडीने सर्वसामान्यांच्या या प्रश्‍नावर निर्णय घेवून ही दरवाढ रोखावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.

 

शिवाजी पुतळ्याजवळील मैदानात मोटारसायकलने आत्महत्या केल्याचा देखावा सादर करीत आगळ्या वेगळ्या प्रकारचे आंदोलन मनसेने केल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. यावेळी झालेल्या आंदोलनात मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील, जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, महिला जिल्हाध्यक्ष सुशीला चव्हाण, अनिल बुचाले, राहूल कनकदंडे, लक्ष्मण रेंगे, बालाजी मुंडे,दिलीप डहाळे, निलेश पुरी, सतीश भणभणे, निशांत कमळू, गोविंद ठाकर, नंदा सावंत, क्रांती तळेकर आदीं सहभागी झाले होते. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा...मनसेच्या  आगळ्या वेगळ्या आंदोलनाचे फोटो...  

 

बातम्या आणखी आहेत...