आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूच्या टिप्परने दुचाकीस्वाराला चिरडले; टायर खाली आल्याने जागेवरच मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन- हसनाबाद रोडवर वाळूच्या टिप्पर दुचाकीस्वाराला जोरादार धडक दिली. यात मांगीलाल माणिकराव व्यवहारे (वय-40, रा.हसनाबाद) याचा जागेवरच मृत्यू झाला. मांगीलाल यांच्या डोक्यावरून टिप्परचे टायर गेल्याने त्यांच्या मेंदूंचा चेंदामेंदा झाला.

 

मिळालेली माहिती अशी की, मांगीलाल व्यवहारे  हे गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भोकरदनहून हसनाबादकडे जात होते. समोरुन भरधाव टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. मांगीलाल व्यवहारे यांचा टिप्परच्या टायरखाली चिरडून जागेवरच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला. मृतदेह बराच वेळ रस्त्यावर पडून होता. पोलिसांनी मृतदेह भोकरदन ग्रामीण रुग्णालयात  पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

 

राधकीसन व्यवहारे (रा.हसनाबाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोउपनि एल.व्ही.चौधरी करीत आहेत.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघातीची भीषणता दाखवणारे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...