आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादहून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची जीप कपिलधारजवळ अपघात, 9 जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- औरंगाबादहून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची जीप उलटून दरीत कोसळल्याची घटना आज (शनिवार)  दुपारी चार वाजेच्या दरम्यान कपिलधारजवळ घडली. या अपघातात नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

औरंगाबाद येथील काही भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीड तालुक्यातील कपीलधारवाडी जवळ वळणावर चालकाचा ताबा सुटून जीप पलटी झाली. घाट असल्याने जीप थेट दरीत कोसळली मात्र फार खाली न जाता झाडाला जीप अडकल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. या अपघातात संगीता प्रसाद, उषा केशव पाबळे, शांताबाई एकनाथ वनमाळी, रूपेश किशोर भुजबळ, किशोर भुजबळ, सीमा जाधव, छाया गायकवाड यांच्यासह अन्य एक असे नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये किशोर भुजबळ व रूपेश भुजबळ यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले.  

 
स्थानिकांची मदत   
अपघातानंतर कपिलधारवाडी येथील स्थानिक नागरिकांनी तत्काळ सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना वेळीच मदत व उपचार यामुळे मिळू शकले. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याचे कामही या नागरिकांनी केले.   

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताचे फोटो

 

बातम्या आणखी आहेत...