आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजोगाई जिल्हा कोर्टातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी फोडली; मुद्देमालाच्या तीन पेट्या लांबवल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूम अज्ञात चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना काल (बुधवार) रात्रीच्या सुमारास घडली.

 

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूममधे तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला असतो. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी न्यायालय अधीक्षक कार्यालयाच्या खिडकीचे दोन गज कापून आत प्रवेश केला. नंतर आतील स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून आतील कपाटातून मुद्देमालाच्या तीन पेट्या लंपास केल्या. या पेट्यात काही रोख रक्कम आणि ठेवींच्या पावत्या असल्याचे समजते.

 

गुरुवारी सकाळी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनेची माहिती कळताच अपर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. चोरीचा पंचनामा सुरू असून त्यानंतर नेमका किती मुद्देमाल चोरीस गेला याची अधिकृत माहिती समजू शकेल.

 

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात अंबाजोगाई शहरातील थंडावलेले चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. यावेळेस चोरट्यांनी थेट न्यायालयाची स्ट्राँगरूम फोडण्याची हिम्मत केल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. न्यायालयच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय,  असा सवाल नागरीकांना पडला आहे. जिल्हा मुख्य न्यायाधीश प्राची कुलकर्णी, पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी अंबाजोगाई न्यायालयात भेट देऊन पाहणी केली.

 

पुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा...अंबाजोगाई जिल्हा कोर्टातील स्ट्राँग रूममध्ये झालेल्या चोरीचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...