आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी 5 दिवस परभणीचे तापमान अधिक राहणार; नांदेडचे तापमानही वाढणार,

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - आगामी पाच दिवसांत परभणीसह हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. या पाच दिवसांत मराठवाड्यात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहणार आहे.  


गेल्या एक महिन्यापासून जिल्ह्यात सूर्य तळपत असून   तापमान ४२ ते ४४ अंश सेल्सियस दरम्यान राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी साडेदहा ते अकरा वाजल्यापासून उन्हाच्या झळा लागत असून दुपारी एकनंतर या उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. वाढत्या उन्हाचा परिणाम बाजारपेठेवर पडत असून दुपारी शुकशुकाट होत आहे. सायंकाळी साडेपाचपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत असल्याने रात्री कमालीचा उकाडा जाणवत आहे.  मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा पारा वाढलेला असून तापमान ४२ अंश सेल्सियसच्यावर राहत आहे. दोन दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण व वारेवाधनामुळे तापमान ३८ अंश सेल्सियसवर गेल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. परंतु गुरुवारपासून तापमानात पुन्हा वाढ झाली आहे.

 

तापमान ४४ अंश सेल्सियस  राहणार
आगामी पाच दिवसांत परभणी व हिंगोली जिल्ह्याचे तापमान ४४ ते ४५, नांदेड ४३ ते ४५, उस्मानाबाद ४०ते  ४१, लातूर ४० ते ४१, बीड ४० ते ४१, औरंगाबाद ४१ ते ४३ अंश सेल्सियस तापमान राहणार असल्याचा अंदाज ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने वर्तवला  आहे.

 

बातम्या आणखी आहेत...