आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 28 व्या वर्षी झाले IPS ऑफिसर; असे गाठले यशाचे शिखर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- धर्माबाद येथे सहाय्यक पोलिस अधिक्षक नूर उल हसन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सध्या सोशल मीडियावर त्याचे कमी वय हा चर्चेत विषय झाला आहे. वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी IPS ऑफिसर झालेल्या हसन यांच्याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. 

 

 

वृत्तपत्र मिळत नव्हते वाचायला

उत्तर प्रदेशातील हरियापूर येथील हसन यांना वृत्तपत्रही वाचायला मिळत नव्हते. पण त्यांना अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी कधीही या गोष्टीचा बाऊ केला नाही. आपल्या मेहनतीने त्यांनी यूपीएससीत 625 वी रॅंक मिळवली. ते ओबीस नॉन क्रिमीलेअर कॅटिगिरीमध्ये त्यांचा समावेश आहे. 

 

हसन यांचे बालपण गरिबीत गेले. पीलीभीत येथे त्यांचे वडील चुतर्थ श्रेणी कर्मचारी होते.  तिघे भाऊ असल्याने आणि फारसे उत्पन्न नसल्याने त्यांच्या वडिलांनी आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवले नाही. त्यांनी आपले आठवी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतुन केले. त्यानंतरचे शिक्षणही त्यांनी सरकारी शाळेतुनच केले. त्यानंतर ते बरेली येथे आले. कारण त्यांच्या वडिलांची तेथे बदली झाली होती. त्यानंतर त्यांनी एमबी महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते नेहमीच टॉपर राहिले. 

 

 

यशाचे रहस्य
आपल्या यशाचे रहस्य आपण चिकाटीने केलेला अभ्यास असल्याचे ते सांगतात. त्यांनी अलीगढ मु्स्लीम विद्यापीठातून बी. टेक. केले. त्यानंतर एका खासगी कंपनीत काम केले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर, नरोरा येथे डिपार्टमेंट ऑफ अॅटोमिक एनर्जीमध्ये त्यांची वैज्ञानिक म्हणुन नियुक्ती झाली. त्या काळात ते बरेलीत एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांना आपले ध्येय गाठायचे असल्याने त्यांनी आपले सगळे लक्ष्य अभ्यासावर केंद्रित केले होते. त्यांचे घरमालक त्यांना वीजेचे बिल जास्त येत असल्याने रात्रीचा अभ्यास करु नकोस असे त्यांना सांगत होते. 

 

 

कुटुंबाचा आधार बनले
हसन यांची आपल्या परिस्थितीवर मात करण्याची प्रबळ इच्छा होती. बी.टेक झाल्यावर त्यांनी आपल्या भावाच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रीत केले. त्याच्या दुसरा भाऊ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केल्यावर एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करत आहे. त्यांच्या यशामुळे त्यांच्या आई-वडिलांनी ते आपल्या कुटुंबाचा आधार बनल्याची भावना व्यक्त करत आनंद व्यक्त केला.  

 

 

तरुणांसाठी प्रेरणास्थान
हसन हे परिस्थितीमुळे हतबल झालेल्या युवकांपुढे एक आदर्श निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आणि कष्ट घेण्याची तयारी असल्यास यश नक्की मिळते, असा त्यांना विश्वास आहे. आपण दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवल्याचेही त्यांनी सांगितले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...