आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपेक्षितांची बाजू मांडण्यासाठी पत्रकारांनी लेखणी झिजवावी; ज्येष्ठ पत्रकार राही भिडेंचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड (सावित्रीबाई फुले साहित्यनगरी)-समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे. त्यामुळे पत्रकारितेतही महिलांपेक्षा पुरुषांना प्राधान्य आहे; परंतु महिला पत्रकारांनी स्वत:ला सिद्ध केले तर त्यांनाही या क्षेत्रात वाव आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी  केले. जाती- धर्माच्या पलीकडे जाऊन पत्रकारांनी वंचित, उपेक्षितांची बाजू मांडण्यासाठी लेखणी झिजवावी असे आवाहनही त्यांनी केले. 


मराठवाडा साहित्य परिषदेच्या ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात रविवारी पहिल्या सत्रात पत्रकार शामल गरुड, शर्मिष्ठा भोसले, अ‍ॅड. मंजुषा दराडेंनी राही भिडे यांची प्रकट मुलाखत घेतली. विविध प्रश्नांना उत्तर देताना राही भिडे म्हणाल्या, समाजव्यवस्था पुरुषप्रधान आहे. त्यामुळे महत्त्वाच्या बिटमध्ये महिलांना काम करण्याची संधी मिळाल्यास त्या अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. 


निर्भया किंवा कोपर्डी प्रकरणानंतर संपूर्ण देशभर कँडलमार्च निघाले, ठिकठिकाणी शोकसभा झाल्या; परंतु खैरलांजी प्रकरणात हे पाहायला मिळाले नसल्याचे सांगताना समाजाने आज कुठल्याही घटनेकडे जात म्हणून पाहू नये तर घटना म्हणून पाहिले पाहिजे, अशी अपेक्षाही पत्रकार राही भिडे यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...