आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा ज्युनियर सचिनकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- वयाच्या चौथ्या वर्षी हातात बॅट घेऊन मैदानावर उतरलेल्या आणि बीडचा ज्युनियर सचिन अशी ओळख मिळवलेल्या सचिन संजय धस या अवघ्या बारा वर्षांच्या क्रिकेटपटूने जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर सचिनकडे १४ वर्षे वयोगटाखालील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा आली आहे. शनिवारी तो राज्य संघाबराेबर स्पर्धेसाठी अहमदाबादला रवाना झाला.    


बीडच्या संस्कार विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकणारा सचिन वडील संजय यांच्यासोबत जिल्हा क्रिकेट संकुलावर जाऊ लागला अन् वयाच्या चौथ्या वर्षीच त्याने हातात बॅट घेतली. प्रशिक्षक अझहर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची तयारी सुरू झाली. तंत्रशुद्ध फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच प्रकारात त्याने आपल्या खेळाने छाप पाडली. याच जोरावर गतवर्षी त्याची १४ वर्षे वयोगटाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली.  निवड चाचणी स्पर्धेतच त्याने धावांचा पाऊस पाडत एक दीड शतक, तीन अर्धशतके  आणि काही बळी घेऊन अष्टपैलू चमक दाखवून महाराष्ट्र क्रिकेट संघातील स्थान  त्याने बळकट केले होते.