आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक: भाजपचे नगरसेवक गोव्याच्या सहलीला! घोडेबाजार टाळण्यासाठी उपाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- कर्नाटक निवकडणुकीनंतर धास्तावलेल्या भाजपने आता महाराष्ट्रात घोडेबाजार टाळण्यासाठी नगरसेवकांना सहलीवर पाठवल आहे. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणूक जिंकण्याच्या महत्वकाक्षेमुळे भाजपने गुरूवारी लातूरमधील आपल्या नगरसेवकांना गोव्यात पाठवले आहे. निवडणुकीपूर्वी आपले नगरसेवक फुटु नये म्हणून भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे.


प्रसारमाध्यामांमध्ये यासंबंधीचे वृत्त प्रसारीत होताच, तीन वेळा नगरसेवकांच्या सहलीचे ठिकाण बदलण्यात आले. याविषयी कोणालीही काहीच कळू नये यासाठी पुर्ण खबरदारी घेण्यात आली. परतुं, हे लपवणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्षांचा प्रयत्न फसला. यामुळे संतापलेले भाजपचे कार्यकर्ते आप्पासाहेब मुंडे यांनी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. शहरजिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांनी हे प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला. ही शैक्षणिक सहल असून याचा खर्च मी स्वत: करत आहे, असा दावा लाहोटी यांनी केला. भाजपने या सहलीबद्दल गोपनीयता बाळगली असली, तरी ही सहल केवळ निवडणुकीपूर्वीची खबरदारी असल्याची चर्चा सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...