आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52 कोटींच्या थकबाकीसाठी लातूर येथील पथदिव्यांची वीज खंडित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- गेल्या दहा दिवसांपासून लातूर शहरातील पथदिव्यांची वीज खंडित करण्यात आली आहे. महावितरणचे ५२ कोटी रुपये बिल थकल्यामुळे हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. रात्री अंधाराचा गैरफायदा घेण्यासाठी भुरटे चोर सक्रिय झाले.चोऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. 


लातूर शहर महापालिकेच्या हद्दीत १६५०० पथदिवे आहेत. या पथदिव्यांच्या बिलाचे महावितरणचे ५२ कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे दहा दिवसांपूर्वी महावितरणने महापालिकेची वीज तोडली आहे. यामुळे लातूरकर अंधारात आहेत. शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूर शहरात सकाळी पाच वाजल्यापासून कोचिंग क्लासेस सुरू होतात. अंधारामुळे ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना क्लासेसला जाताना अडचणी येत आहेत. कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. अंधाराचा फायदा घेऊन भुरटे चोर सक्रिय झाले आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी पर्स हिसकावणे, साखळी ओढणे असे प्रकार वाढले आहेत. महापौर पवार, आयुक्त अच्युत हांगे मुंबईला गेले.ऊर्जा मंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. बैठकीत यावर तोडगा निघेल अशी आशा उपमहापौर काळे यांनी व्यक्त केली आहे.  

 

अंधाराचा फायदा घेत चोऱ्यांचे प्रमाण वाढले
मंगळवारी रात्री केशवनगर परिसरात रस्त्यावरून घराकडे जाणाऱ्या  महिलेच्या हातातील पर्स चोरट्याने हिसकावून नेली.  पर्समध्ये ५ हजार रुपये होते, अशी तक्रार त्या महिलेने पोलिस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत विजय कॉलनी परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला दुसऱ्या दुचाकीवरील दोघांनी धडक दिली. जोडपे खाली पडल्यानंतर त्यातील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेले. अंधारामुळे त्या चोरट्यांच्या गाडीचा क्रमांकही जोडप्याला पाहता आला नाही.

बातम्या आणखी आहेत...