आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YOUTUBE वरून शिकले कसे फोडायचे ATM, झटपट श्रीमंत होण्यासाठी युवकांचा नवीन फंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवकांनी एटीएम फोडण्यासाठी तयार केलेले साहित्य. - Divya Marathi
युवकांनी एटीएम फोडण्यासाठी तयार केलेले साहित्य.

बीड - गुरुवारी पहाटे दोन ठिकाणी एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यानंतर आता या टोळीचे इतर कारनामेही समोर येऊ लागले आहेत. टोळीतील सर्व पाच जण हे २० ते २५ वयोगटातील अाहेत. यू ट्यूबवरून या युवकांनी एटीएम कसे फोडायचे याची माहिती जमवली, व्हिडिओ पाहिले आणि दोन महिन्यांत तीन वेळा एटीएम तर एक वेळा थेट बँक फोडण्याचा प्रयत्न केला.   


गुरुवारी पहाटे तर बीडमध्ये प्रयत्न फसल्यानंतर थेट राजुरीचे एटीएम मशीनच उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी विशाल राख, बाळू मुंडे व जीवन पवार या तिघांना अटक केली, तर मास्टरमाइंड असलेल्या आरोपीसह अन्य एक फरार आहे. दरम्यान, या तरुणांनी एटीएम फोडण्याचे तंत्र कुठे शिकले याची चौकशी केली असता फरार असलेल्या मास्टर माइंडने यू ट्यूबवरून एटीएम कसे फोडायचे याचे व्हिडिओ पाहिले, त्यासाठी काय काय साहित्य लागते याची माहिती घेतली. त्यानुसार साहित्य जमा केले. मग त्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारायच्या रंगाच्या स्प्रेपासून ते गॅस कटर, बोटांचे ठसे मिळू नयेत म्हणून ग्लोव्हज, हातोडी व एटीएम तोडण्यासाठी आवश्यक इतर साहित्य घेतले. दोन महिन्यांपूर्वी राजुरी येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला.  त्यांनी त्यावर दगड घातले. पण एटीएम फुटले नाही. पुन्हा तयारी करून या टोळीने खालापुरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु तिथेही ते अयशस्वी झाले. यानंतर पुन्हा त्यांनी गुरुवारी सुरुवातीला बीडमधील राजीव गांधी चौक व नंतर राजुरीतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. ते फुटत नसल्याचे पाहून थेट उचकटून जीपमध्ये भरत असताना पोलिस आले आणि त्यांचा भंडाफोड झाला. 

 

दोघे जण रेकॉर्डवर   
पकडण्यात आलेला बाळू मुंडे याच्यावर बारामतीमध्ये दुचाकी चोरीचा गुन्हा आहे, तर मास्टरमाइंड असलेल्या व सध्या फरार असलेल्या आरोपीवरही नगर जिल्ह्यात जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे आहेत.   

 

यांची होती ‘टिप’  
बाळू मुंडे हा खालापुरीचा रहिवासी आहे. बँक फोडण्याचा प्रयत्न करण्याच्या दिवशीच बँकेत तीन गोण्या भरून स्टेशनरी साहित्य आले होते. बाळूला मात्र तीन गोण्या भरून पैसे आले असे वाटले अन् खालापुरीची बँक फोडण्याचा प्रयत्न झाला. तर श्रावण पवार हा राजुरीचा रहिवासी आहे. त्यामुळे गावातील एकमेव एटीएममध्ये पैसे आहेत की नाही याची त्याला माहिती असायची. शिवाय दोन्ही ठिकाणी पोलिस चौकी नसल्याने ते सोपे होते.  

 

  पुढील स्लाईडवर पहा...  आणखी फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...