आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी जवळील भोजनकवाडी शिवारात बिबट्याने केला हल्ला; एक शेतकरी जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी वैजनाथ - परळी तालुक्यातील धर्मापुरी जवळच्या  भोजनकवाडी शिवारात  बिबट्याचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. काल दि. 17 रोजी शेतात काम करणाऱ्या एका जणांवर त्याने साधारण हल्ला केला.बिबट्या ने केलेल्या या  हल्ल्यात एक शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. गावाजवळील माळरानातून तो डोंगरदरीत गेल्याची शक्यता असून वनविभागाच्या वतीने याची शहानिशा करण्यात आली आहे.  नागरीकांनी घाबरू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे.

 

भोजनकवाडी गावाच्या आसपास डोंगरजमीन आहे. तसेच परिसरात दौंडवाडी शिवारातील डोंगरपरिक्षेत्र व काहीप्रमाणात झुडपीवनक्षेत्र आहे. दि. 17 रोजी दुपारी सुमारे 2.30 ते 3 वा. सुमारास गावातील अंकुश वसंत केदार रा. भोजनकवाडी वय 23 वर्षे हा युवक आपल्या शेतातील मिरचीला पाणी देत होता. यादरम्यान वीज खंडित झाली. पाणी पिण्यासाठी म्हणून तो विहीरीवर गेला. त्यावेळीच झाडाझुडूपांच्या आवघळयातून अचानक त्याच्या अंगावर बिबट्याने झेप टाकली. या शेतकऱ्यांकडून धैर्याने बचावात्मक प्रतिकार केल्या गेल्याने बिबट्या तेथून पसार झाला. बिबट्याच असल्याचे या युवकाने  सांगितले.

 

या हल्ल्यात हा युवक जखमी झाला असून त्याच्या हाता -पायांवर जखमा झाल्या आहेत. त्याच्यावर धर्मापुरी येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.आपल्या शिवारात वाघ असल्याची  चर्चा गावात व परिसरात पसरली. या मुळे नागरिकांत भिती निर्माण झाली. शिवारात  बिबट्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बाबत वनविभागाला गावकऱ्यांनी ही माहिती दिली. वनविभागाच्या वतीने तातडीने शहानिशा व शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी बिबट्या चा वावर झाल्याच्या खुणा आढळून आल्या असल्याचे प्रथमदर्शनी  दिसून आले आहे. 

 

नागरिकांनी घाबरू नये. ....
दरम्यान वन्यजीव हे नैसर्गिक समतोलासाठी आवश्यकच आहेत. या ठिकाणी बिबट्याची चाहूल असण्याचे संकेत - खुणा असल्याचे आढळून आले आहे .वनविभागाच्या वतीने सर्वतोपरी शोध घेण्यात येत आहे.पंचनामा देखील करण्यात आला आहे. बिबट्या हानी करणारा प्राणी नाही. तसेच तो एका ठिकाणी कायम राहत नाही. त्यामुळे नागरीकांनी घाबरून जाऊ नये. तसेच जखमीला योग्य ती शासकीय वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 

- बी. जी. कस्तुरे वनपाल, वनपरिक्षेत्र परळी वैजनाथ

बातम्या आणखी आहेत...