आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थीच चालवतात विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय; वाढदिवसाला ग्रंथालयाला देतात पुस्तके भेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव- ग्रंथालय ज्ञानाच्या प्रसारासाठी अमूल्य आणि सुलभ साधन असून  एकही शाळा गाव ग्रंथालयाविना राहता कामा नये हे विचार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आहेत. याच विचारांचा वसा घेत  माजलगाव येथील नवविकास मंडळाच्या जवाहर विद्यालय आणि महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय या दोन शालेय शाखेतील  विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची निर्मिती केली आहे. प्रत्येक विद्यार्थी वाढदिवसाला या ग्रंथालयाला पुस्तके भेट देत असून शाळेतील  विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी हे ग्रंथालय चालवत आहेत.    
 
शाळेत विद्यार्थ्यांना  वाचनाची आवड निर्माण व्हावी, मुलांनी सतत वाचत राहावे,वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी ,प्रत्येक ग्रंथास वाचक मिळावे व प्रत्येक वाचकास ग्रंथ मिळावेत या उद्देशाने माजलगाव येथील शाळेत ग्रंथालयाची चळवळ रुजत आहे.     
 
शाळेतील  विद्यार्थी स्वतःच्या वाढदिवसा निमित्त  सावित्रीबाई फुले ग्रंथालय व जवाहर ग्रंथालय या दोन्ही ग्रंथालयास एक पुस्तक भेट देतात. मागील दोन वर्षे पासून मुख्याध्यापक  प्रभाकर साळेगावकर यांच्या संकल्पनेतून ही चळवळ रुजत आहे. ग्रंथालयात या वर्षभराच्या काळात सुमारे २,००० ग्रंथ दाखल झाले आहेत हे विशेष. हा उपक्रम राबवण्यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापक प्र.अ. भिलेगावकर,प्रभाकर साळेगावकर,अभिमन्यू इबीते नेहमीच आग्रही असतात. 
 
संस्थेचे कार्यवाह माजी आमदार डी.के.देशमुख हे मार्गदर्शन करताना नेहमी सांगतात वाचन संस्कृती टिकवण्यासाठी संस्कार मूल्ये रुजवण्यासाठी ग्रंथालय चळवळ अजून गतिमान व सक्षम झाली पाहिजे तेंव्हाच येणारा काळ उज्ज्वल असेल . ग्रंथालयाच्या स्थापनेपासून एक गोष्ट  प्रकर्षाने जाणवते विद्यार्थी विविध स्पर्धामध्ये वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा, कथाकथन, वृत्तांकन लेखन,काव्य लेखन विविध कलाविष्कार यात प्रचंड संख्येने सहभागी नोंदवत आहेत. 
 
विविध ग्रंथाचा समावेश 
माजलगाव येथील या दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी  साकारलेल्या या अभिनव ग्रंथालयाच्या निर्मितीमुळे विविध कथा,गोष्टी,कादंबऱ्या,लेख,निबंध,शैक्षणिक साहित्य असे विविध स्वरूपाचे पुस्तकरूपी ग्रंथ दाखल झाले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...