आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसेचे मोटारसायकल आत्महत्या आंदोलन, पेट्रोल दरवाढीचा निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - पेट्रोल डिझेलच्या दरात होत असलेली दरवाढ लक्षात घेतल्यास शेतकऱ्यांप्रमाणेच आता वाहनधारकांनाही आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीती व्यक्त करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी(दि.२३) येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोटारसायकलने आत्महत्या केल्याचे आंदोलन केले.  


दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात मोठी वाढ होत आहे. परिणामी सर्वसामान्य जनता या महागाईत होरपळून निघत आहे. पेट्रोलचे भाव शहरात सातत्याने विक्रमीच राहिले आहेत. मंगळवारी तब्बल ८६ रुपये प्रतिलिटरचा भाव राहिला. महाराष्ट्रात नव्हे तर देशातही हा भाव विक्रमी नोंदवला गेला आहे. डिझेलचे दरही ७२ रुपयांवर पोहोचले आहेत. घरगुती गॅसही ८०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे अच्छे दिनचे स्वप्न दाखविणाऱ्या या सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. भविष्यात ही दरवाढ कमी झाली नाही तर शेतकऱ्यांप्रमाणेच मोटारसायकल धारकांच्या व घरगुती गॅससाठी गृहिणीच्या आत्महत्या होतील, अशी भीती  मनसेने व्यक्त केली. केंद्र सरकारने तातडीने सर्वसामान्यांच्या या प्रश्‍नावर निर्णय घेऊन ही दरवाढ रोखावी अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला.  


मोटारसायकल आत्महत्येचा देखावा

शिवाजी पुतळ्याजवळील मैदानात मोटारसायकलने आत्महत्या केल्याचा देखावा सादर करीत आगळ्या वेगळ्या प्रकारचे आंदोलन मनसेने केल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. 

बातम्या आणखी आहेत...