आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श संस्थेसाठी बांधकाम परवानगी; आमदार क्षीरसागरांना पालिकेची नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीडचे राष्ट्रवादीचे आमदार क्षीरसारगर यांनी स्वत: सचिव असलेल्या आदर्श शिक्षण संस्थेच्या इमारत बांधकामास बीड नगर पालिकेकडून परवानगी मिळवली. यात नगराध्यक्षांनी नियम धाब्यावर बसवून  परवानगी दिली आहे. प्रकरणी पालिकेचे गटनेते फारुक पटेल यांनी केलेल्या तक्रारीवरुन सर्व प्रकार उघड झाला आहे. मालकी हक्काचे कुठलेही अधिकृत पुरावे सादर न करता फक्त पीटीआरच्या आधारावर थेट बांधकाम परवानगी देण्यात आली. या प्रकरणी आमदार क्षीरसागर यांना बीड पालिकेने १२  डिसेंबर रोजी कारवाईची नोटीस बजावली आहे.  


पालिकेने  आदर्श शिक्षण संस्थेस घर क्र.१.३.१७८९ मधील बांधकामास २५ ऑक्टोबर २०१७ रोजी बांधकाम परवानगी दिली आहे. या संदर्भात रवींद्र क्षीरसागर यांनी त्याच मिळकतीची माहिती व मुळ संचिका पालिकेकडे मागितली होती. यावर पालिकेने  ९  ऑक्टोबर २०१७  रोजी मुळ संचिका व कुठलेही कागदपत्र उपलब्ध नसून फक्त पीटीआर उपलब्ध असल्याचे क्षीरसागर यांना पत्राद्वारे कळविले होते. या आधारे फारुक पटेल यांनी आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव आमदार क्षीरसागर यांना कुठल्या आधारे बांधकाम परवानगी दिली याची माहिती पालिकेकडे मागितली होती. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. मुुळ संचिकेची नक्कल देण्यात यावी, अशी मागणी पालिकेच्यामुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यानंतर ती देण्यात आली.विशेष म्हणजे सदरील संचिका मागितल्यानंतर फक्त  पीटीआरच्या आधारावर बांधकाम परवानगी दिल्याचे दिसून आले आहे. यात आता पालिका प्रशासनाने घर क्र. १.३.१७८९ मधील जागेत वितरीत केलेल्या बांधकाम  परवानगी प्रस्ताव मालकी हक्काची कागदपत्रे सादर करावीत नसता कारवाई करण्यात येईल अशी नोटीस आमदार क्षीरसागरांना बजावली आहे. 

 

आमदारकी, नगराध्यक्षपद रद्द करा  
आमदार क्षीरसागर आणि नगराध्यक्ष  क्षीरसागर यांनी पदाचा दुरुपयोग  केलेला आहे. पालिकेतील अनेक प्रकरणांत कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून नियमबाह्य कामे केली आहेत. आदर्श शिक्षण संस्थेला मिळवलेली बांधकाम परवानगीही अधिकाऱ्यांवर दबाव टाकूनच घेतलेली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करुन आमदारकी व नगराध्यक्षपद  रद्द करा, अशी मागणीही गटनेते पटेल यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...