आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादमध्ये शौचालय बांधण्यावरुन सख्ख्या भावाचा खून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोहारा (उस्मानाबाद)- शौचालय बांधकामाच्या कारणावरुन एकाने आपल्या सख्ख्या भावाला  ठार मारल्याची घटना लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे घडली आहे. याप्रकरणी लोहारा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली आहे.

 

 

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील नंदकिशोर बिराजदार व शामसुंदर बिराजदार या दोघा भावात घराच्या पाठीमागील बाजुस दि. 7 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शौचालय बांधकामाच्या कारणावरुन एकमेकांना दगड मारुन भांडण करीत होते. आरोपी नंदकिशोर यांनी भाऊ शामसुंदर बिराजदार यास रागाच्या भरात जोरास दगडावर ढकलुन दिले. यामध्ये शामसुंदर बिराजदार याच्या  कपाळावर, उजव्या डोळ्याला व डोक्यास जबर मार लागुन डोके फुटले. यास सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात घेवुन जात असताना उपचारापूर्वी निधन झाले. याबाबत लोहारा पोलिस ठाण्यात मयताचे सासरे वसंत कोमटे (रा. सिरसल ता. औसा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन लोहारा पोलिस ठाण्यात नंदकिशोर बिराजदार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक गंगाधर दराडे हे करीत आहेत. आरोपी नंदकिशोर बिराजदार यांना लोहारा पोलिसांनी अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...