आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादीची ‘सायकलस्वारी’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - सरकारने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी माजलगावमध्ये काँग्रेस (आय) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी सायकलस्वारी करून आंदोलन करण्यात आले.


मोदी सरकार सत्तेवर येऊन चार वर्षे झाली. मात्र अच्छे दिन अद्याप आले नाहीत. या सरकारच्या काळात शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार तरुण यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत.

 

सर्वच घटक अडचणींचा सामना करत असताना यात भर म्हणून इंधन दरवाढ करून भाजप सरकारने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. माजलगावमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीविरोधात सायकलस्वारी आंदोलन करण्यात आले. काँग्रेस (आय) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सायकलस्वारी सुरू केली तहसील कार्यालयात याचा समारोप करण्यात आला. 

 

आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायण होके, विश्वांबर थावरे, अहमद शेख, मनोहर डाके, बालासाहेब जाधव, विनोद सुरवसे, शिवहार सेलूकर, किरण ढगे, संभाजी होके सहभागी झाले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...