आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हुंड्यासाठी मुलीला गोळी घातली; सपोनि चव्हाणांविरुद्ध मोनिकाच्या वडिलांची फिर्याद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

येरमाळा- येरमाळा येथील सहायक पोलिस निरीक्षकाच्या पत्नीचा गोळी लागून झालेल्या मृत्यू प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. ही आत्महत्या नसून तिचा पती  सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण याने सरकारी पिस्तुलातून गोळी झाडून खून केला असून चारित्र्याच्या संशयावरून व हुंड्यातील राहिलेले ५ लाख रुपयांची रक्कम घेऊन येण्याच्या कारणावरून भांडण करत मुलीचा खून केला, अशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिल्याने पोलिस ठाण्याचे इन्चार्ज असलेल्या चव्हाणांसह त्यांच्या आई-वडील व नातलगांवर त्याच ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.  


 २५ जानेवारी रोजी सकाळी येरमाळा पोलिस ठाण्यातील सपोनि विनोद चव्हाण यांची पत्नी मोनाली यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात नेले जात असताना त्यांचा मृत्यू झाला होता.  लग्नाला तीन वर्षे झाले तरी मूल  होत नाही या कारणावरून नैराश्येतून मोनाली यांनी पतीच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची चर्चा होती.  परंतु, मुलीचा अंत्यविधी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोनालीचे वडील शेषांक जालिंदर पवार (४८, रा. चौसाळा जि. बीड) यांनी मुलगी मोनालीने आत्महत्या केली नसून तिचा चारित्र्याच्या संशयावरून तसेच हुंड्यातील राहिलेली ५ लाख रुपयांची रक्कम आण म्हणून पतीनेच खून केल्याची तक्रार दिली.   मोनालीचे वडील शेषांक पवार हे   शिरूर पोलिस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत.  

 

पाच जणांविरुद्ध गुन्हा
पवार यांच्या तक्रारीवरून सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, सासू विमल  चव्हाण, सासरा बापू चव्हाण, चुलत सासू निर्मला शिवाजी चव्हाण, चुलत सासरा शिवाजी चव्हाण अशा एकूण पाच जणांविरोधात भादंवि कलम ३०२, ४९८-ए व ३४ अन्वये गुन्हा नोंद करून तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्याकडे देण्यात आला आहे.  

बातम्या आणखी आहेत...