आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- आई-वडील ऊस तोडायला गेले म्हणून ... गावात शाळा नाही ... शाळेपर्यंत एसटी नाही ... ही कारणे मांडली बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील बालविवाह पीडित मुलींनी. विशेष म्हणजे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातील या तालुक्यात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत असल्याची व्यथा या मुलींनी राज्य बालहक्क संरक्षण आयोगापुढे मांडली.
लेक लाडकी अभियानच्या वतीने शिरूर कासारमध्ये शुक्रवारी बालकांच्या हक्कासाठी देशातील पहिली जनसुनावणी झाली. आरोग्य विभागातील आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शिरूर कासारमधील ७३ बालविवाह चालू वर्षभरात या अभियानतर्फे थांबवण्यात आले. मात्र, यंत्रणेला पूर्वसूचना देऊनही १३ बालविवाह थांबवण्यात आले नाहीत ही तक्रार वकील वर्षा देशपांडे यांनी आयोगापुढे मांडली. १५ व्या वर्षी आपला २९ वर्षांच्या वराशी कसा विवाह लावून दिला आणि याबाबत पोलिसांकडे दाद मागूनही मदत कशी मिळाली नाही ही तक्रार सोनी बढे या तरुणीने आयोगापुढे मांडली. अखेरीस, प्रचंड मारहाण सहन केल्यावर आपल्याला कसे पतीकडून पळून यावे लागले याची व्यथा त्यांनी मांडली.
‘माझ्यावर १५ व्या वर्षी लग्न लादण्यात आलं, १७ व्या वर्षी माझं पाहिलं बाळंतपण झालं, आज मी १९ वर्षांची असून दुसऱ्यांदा मला दिवस गेले आहेत. बारावीनंतर पोलिस बनायचं होतं, पण सारंच अर्धवट राहिलं,’ ही तक्रार सना पठाणने आयोगापुढे मांडली. या वेळी तालुक्यातील २५ मुलींनी त्यांचे प्रश्न निदर्शनास आणून दिले.
कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार
बालविवाहाचा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. बाल संरक्षण समित्यांचे प्रशिक्षण करून, गावात बालविवाह झाल्यास त्या समित्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची शिफारस आम्ही शासनाला करणार आहोत. पूर्वसूचना देऊनही शिरूर कासारमधील १३ बालविवाह का थांबवण्यात आले नाहीत, याबाबत सुमोटो चौकशी करून निष्काळजी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार आहोत.
-प्रवीण घुगे, अध्यक्ष, राज्य बाल संरक्षण आयोग
पुढील स्लाइडवर पाहा, मुलींनी मांडल्या या समस्या...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.