आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हातारी मेल्याचे दु:ख नाही काळ सोकावु देऊ नका; चव्हाण साहेब आत तुम्ही छडीचा वापर करा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - बीड जिल्ह्यातील काँग्रेस पहायची असेल तर ती दुर्बीनीतुन पहावे लागते, तुम्ही जर आम्हाला ताकद  दिली तर पुढचा काळ काँग्रेसचा येईल. साहेब पक्षातले छुपे रूस्तुम शोधा, दगाबाजांना थारा देवु नका,  ज्यांनी काँग्रेसशी गद्दारी केली. त्यांना धडा शिकवा, म्हातारी मेल्याचे दु:ख नाही साहेब काळ सोकावु देऊ नका. तुम्ही आता छडीचा वापर करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टि.पी.मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली. बीड येथे कॉग्रेस पक्षाचे शिबीर पार पडले यावेळी ते बोलत होते.  

 

बीड जिल्ह्यात काँग्रेस आयसीयुत असुन ती पहायची असेल तर दुर्बीनमधुन पहावी लागते. जिल्ह्यात काँग्रेसची ताकदत राहीली नाही अशी टिका केली जाते. परंतु आगामी विधानसभा व लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर जिल्ह्यात  जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी बरोबर आघाडी होवो अथवा न होवो जिल्ह्यात आगामी निवडणूकीत पक्षाचे सहा आमदार व एक खासदार निवडूण आणण्यासाठी तयारी काँग्रेसने सुरू केली आहे.  शिबिराच्या निमित्ताने जिल्हा दौऱ्यावर आलेल्या  नेत्यांनी गेवराई तालुक्यातील गारपीटग्रस्त  भागात जावुन  शेतकऱ्यांना भेटण्याची संधी सोडली नाही . कर्जमाफी पासुन गारपीटीपर्यंत शेतकऱ्यांशी संवाद साधत नेत्यांनी भाजप सरकारला चांगेलच टिकचे लक्ष केले . पक्षातील कार्यकर्त्याची वैचारीक चौकट बळकट व्हावी म्हणून एक दिवसीय शिबिर घेतले गेले. या शिबिराला प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण , माणीकराव ठाकरे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते बाळासाहेब विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी, खासदार रजनी पाटील, विनायक देशमुख, चारूताई टोकस यांनी हजेरी लावत भाषणातुन  कार्यकर्त्यात पक्षाबद्दल एक विश्वास जागवला. राष्ट्रवादी बरोबर आघाडी करतांना ती सहज होणार नाही तर पहिल्या पेक्ष वेगळा निर्णय घेतला जाईल. आम्ही कोणाच्याही बरोबर फरपटत जाणार नाहीत असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. गुजरातच्या निवडणूकीनंतर वातावरण बदलले असुन राहुल गांधी यांच्या हातात देशाची सुरक्षा राहु शकेल असा विश्वास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना असल्याचा दावा बीडमध्ये आलेल्या नेत्यांनी केला. या शिबिरात केंद्र व राज्यातील भाजप सरकार , त्यांचे ध्येय धोरणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकुन टाका करण्याची संधी काँग्रेसच्या नेत्यांनी सोडली नाही. 


सोने तपासतात तसे कार्यकर्ते तपासा 
काँग्रेसच्या शिबिरात पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.मुंडे यांनी भाषणात पक्षातील वास्तव समोर मांडत अशोक चव्हाण यांना  जिल्ह्यातील काँग्रेसची अवस्था, पक्षातील नेतृत्व, कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय याचा वाढा वाचला. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या तालमीत आपण तयार झाला असुन आपण आता छडीचा वापर करावा. जिल्ह्यात काँग्रेसमध्ये येणारे कार्यकर्ते सोने तपासतात तशा प्रमाणे तसे तपासा. अशी विनंती केली. तेंव्हा चव्हाण यांनी भाषणात उत्तर देतांना कार्यकर्ते पारखण्यासाठी माझ्याकडे वेळ राहणार नसुन  जो जिता वही सिंकदर या प्रमाणे लोक ज्याची मागणी करतील त्यालाच पक्षाची उमेदवारी द्यावी लागणार आहे. असे सांगीतले. 


पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करण्याचा नारा 
या शिबिरात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना काही मोर्चेबांधणीचे टिप्स दिले. आपल्याला आता गावनिहाय जावुन काम करावे लागणार असुन बुथची बांधणी करायची आहे.  आठ महिने आपलयाला प्रयत्नाची पराकाष्टा करायची आहे. आम्ही प्रचार यंत्रणा उभारू  असेही चव्हाण यांनी सांगुन कार्यकर्त्यांना कामाला लागा हाच संदेश दिला.

बातम्या आणखी आहेत...