आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना हमीभाव दिल्यास कर्जमाफीची आवश्यकता नाही- पर्यावरणमंत्री रामदास कदम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- राज्यामध्ये वारंवार दुष्काळी स्थिती निर्माण होते. पाणीटंचाईमुळे  शेतीसह पशुधन सांभाळण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर  निर्माण होते. मात्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवले जात नाही, ही शरमेची बाब आहे. राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पायावर उभे करायचे असेल तर शेतीमालाला हमीभाव देणे गरजेचे आहे. यातून शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल. त्यांना कर्जमाफीची गरज पडणार नाही, असे  प्रतिपादन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बीड येथे केले.


बीड येथील शिवसेनेच्या  जिल्हा संपर्क कार्यालयात बुधवारी  आयोजित कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाप्रसंगी पर्यावरणमंत्री कदम बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे, महाराष्ट्र राज्य संघटक गोविंद घोळवे, महिला आघाडी प्रमुख संपदा गडकरी, माजी मंत्री बदामराव पंडित, माजी आमदार सुनील धांडे,  अॅड. चंद्रकांत नवले, माजी जिल्हाप्रमुख बाळासाहेब पिंगळे, जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे, जिल्हाप्रमुख सचिन मुळक,  सुदर्शन धांडे, नितीन धांडे, सुशील पिंगळे  आदी उपस्थित होते.


पर्यावरण मंत्री कदम म्हणाले जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे, पण प्रवेश कार्यक्रमाचे जाहीर सभेत रूपांतर होईल हे मला माहीत नव्हते. आजच्या वातावरणावरून अन्य पक्षांनी लक्षात घेण्याची गरज आहे की प्रवेश म्हटले की एवढी गर्दी शिवसेना कार्यालयासमोर होत आहे आणि आम्ही जाहीर सभेचे आवाहन केल्यास केवढी गर्दी होईल, हे नवीन दोन्ही जिल्हाप्रमुखांनी त्यांची कार्यक्षमता सिद्ध करून दाखवली आहे. राज्यामध्ये आजवरची  पाणीटंचाई, दुष्काळ हे प्रश्न नवे नाहीत. परंतु सरकारकडून ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. भाजपने सामान्यांसह शेतकऱ्यांना अच्छे दिन आणू, असे सांगून सत्तेत   विराजमान झाले. परंतु आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कोणतेही  ठोस निर्णय घेतले हे स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. एकीकडे शेतीमालाला भाव मिळत नाही आणि दुसरीकडे कर्जमाफी देण्याची तयारी दाखवली जात आहे. परंतु शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नाही ही सत्य परिस्थिती आहे.  

 

काळ्या मातीत होणार विभागीय क्रीडा संकुल  
विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री असताना लातूरला विभागीय क्रीडा संकुल मंजूर केले होते. परंतु त्याला २२ एकर जागा लागणार असल्यामुळे क्रीडा संकुल होऊ शकले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तत्कालीन राज्यमंत्री अमित देशमुख यांनी क्रीडा संकुल कव्हा शिवारात होईल असे सांगून त्याचे भूमिपूजनही केले होते. परंतु क्रीडा विभागाने या परिसरात मोठ्या प्रमाणात काळी माती आहे. बांधकाम टिकणार नाही आणि जादा पैसे लागतील असा प्रतिकूल अहवाल दिला. साडेतीन वर्षांचा वेळ गेल्यानंतर अहवालाकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा कव्हा शिवारातच विभागीय क्रीडा संकुल करण्याचा घाट घातला जात आहे.

 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे गरजेचे

शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ओळखणारा आणि त्यांचे प्रश्न जाणणाऱ्या मुख्यमंत्र्याची अावश्यकता असतेे.  शेतकऱ्यांची प्रश्न, शेतीमालाला भाव यासह अनेक हक्क देण्यासाठी  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे, असेही कदम यांनी  केले.

बातम्या आणखी आहेत...