आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाने जिल्ह्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली; खा.जाधव यांचा आरोप, 19 ला महामोर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- एकेकाळी जिल्ह्याच्या पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या कार्याने हा जिल्हा ओळखला जात असताना सद्य:स्थितीतील पोलिस प्रशासनासह महसूल व महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी पद्धतीमुळे जिल्ह्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचे काम झाले असल्याचा रोखठोक आरोप करीत खा.संजय जाधव यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह नागरिक, व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेनेच्या वतीने येत्या १९ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी (दि.१२) येथे पत्रकार परिषदेत दिली.    


खा.जाधव यांनी वीज कंपनीविरोधात आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करीत रात्री-बेरात्री ताब्यात घेतले. न्यायालयात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करीत पाच दिवसांची पोलिस कोठडी मागितली, असे सांगताना पोलिस दलात सध्या काय चालू आहे, याची सर्व माहिती आहे. मात्र, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली जाणारी वागणूक ही गंभीर आहे. अवैध धंदे वाटप करून घेण्याचेच काम पोलिस दलात सुरू आहे, असाही आरोप खा.जाधव यांनी केला. महसूलमध्येही वाळू वाहतूकदारांवर कारवाई करून कितीतरी पट दंड आकारला जात आहे. यातून सर्वसामान्यांचीच वाळूचे दर वाढवून पिळवणूक केली जात आहे. यात महसूलसह पोलिसही हप्ता घेण्याचेच काम करीत आहेत. महापालिकेचे अधिकारीही मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. एलबीटीची वसुली असो की घरपट्टी, यांच्याच पद्धतीने दंड आकारणीचे काम सुरू आहे. 

बातम्या आणखी आहेत...