आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेर्टातून चाेरी गेलेल्या एेवजात याेगेश्वरी देवीचे 25 ताेळे साेने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजाेगाई- सत्र न्यायालयाच्या स्ट्राँगरूममधून बुधवारी मध्यरात्री चाेरीस गेलेल्या तीनपैकी एका पेटीत याेगेश्वरी देवीचे २५ ताेळे साेने असल्याची माहिती शुक्रवारी समाेर अाली. सहा वर्षांपूर्वी चाेरट्यांनी मंदिरातून हे दागिने चाेरले हाेते. पाेलिसांच्या तपासात ते सापडले मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अजून त्याचा ताबा देवस्थानकडे देण्यात अाला नव्हता.


चाेरट्यांनी पळवलेल्या दुसऱ्या पेटीत १६० घड्याळे,  रोख रक्कम, दुसऱ्या एका  गुन्ह्यातील १० ताेळे दागिने असे एकूण ४ लाख ३२ हजार ९२४ रुपये किमतीचे  दागिने होते,  तर तिसऱ्या पेटीत मुद्देमालाची अद्याप नाेंदणीच झाली नव्हती.  

 

मुंडेंनी जाेगवा मागून केले हाेते नवे दागिने
१८ एप्रिल २०१२ रोजी  पहाटे  योगेश्वरी देवीचे  २५ तोळे दागिने चाेरीस गेले हाेते. त्यावर देवीला पुन्हा दागिने करण्यासाठी दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांनी शहरातून परडीचा जोगवा मागत  पैसे जमा केले हाेते. त्यात अापल्याकडील काही रक्कम टाकून त्यांनी देवीला पुन्हा ३२ ताेळे दागिने केले, तर या चाेरीचा प्रश्न अामदार धनंजय मुंडे यांनी विधिमंडळातही उपस्थित केला हाेता.

बातम्या आणखी आहेत...