आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींचा लैंगिक छळ प्रकरण; न्यायालयाने सुनावली चार दिवसांची पोलिस कोठडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या ढोरवाडीच्या शिक्षकाला मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांनी सोमवारी  तडकाफडकी निलंबित केले, तर न्यायालयानेही १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली.    


ढोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिगंबर शिंदे याने काही विद्यार्थिनींना अश्लील फोटो दाखवून त्यांचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रविवारी या प्रकरणी त्याच्या विरोधात वडवणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी शिंदे याला अटक केली होती. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी नजमा पटेल यांनी तत्काळ शिंदे याच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांनी तो तत्काळ मंजूर करत शिंदे याचे तडकाफडकी निलंबन केले. निलंबन काळात अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी कार्यालय मुख्यालय म्हणून देण्यात आले आहे. सोमवारी दिगंबर शिंदे याला न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला १४ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...