आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैनिक धबडगे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार;संचलनादरम्यान हृदयविकाराचा झटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- जम्मू काश्मीर येथे कार्यरत असलेला भारतीय सेनेचा वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील जवान चंद्रकांत धबडगे यांना संचालनादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला होता. शनिवारी त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.    


वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील चंद्रकांत धबडगे हे  १९९७ मध्ये भारतीय सेवेत दाखल झाले होते. ९ फेबुवारी रोजी जम्मू येथे सैन्याच्या एका  संचलन कार्यक्रमात त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा मृतदेह टेंभुर्णी येथे आणण्यात आला. ही माहिती गावपरिसरात अगोदरच पसरल्याने ग्रामस्थ मोठ्या संख्येने टेंभुर्णी येथे दाखल झाले होते. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात आल्यावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसंगी भारतीय जवानांनी त्यांना तोफांची सलामी दिली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच गावात शोककळा पसरली होती. चंद्रकांत धबडगे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर ज्ञानोबा बाणापुरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकिरण काशिद, हट्टा पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुनील नाईक, वसमत ग्रामीणचे अशोक जाधव, शुद्धोधन जोंधळे, सैन्याधिकारी सत्येंद्रकुमार  आदींची उपस्थिती होती. चंद्रकांत धबडगे यांच्या पश्चात आई, पत्नी, चार भाऊ, दोन बहिणी, दोन मुले असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...