आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली न झाल्याने हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांच्यावर आत्महत्येची वेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - बदली करताना माझा विचारच करण्यात आला नाही, त्यातच मी कर्जबाजारी झाले असून माझे कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्यामुळे मझ्यासमोर आत्महत्या नाहीतर राजीनामा देणे हेच पर्याय असल्याचे हिंगोलीच्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात खंत व्यक्त केली. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.


सुजाता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात सुरुवातीला लिहले की
 मला माफ करा.  मला मुंबईतून  पदोन्नती मिळाल्याने थेट  य २०‍१६  मधे हिंगोली येथे  पोलिस उपाध्यक्ष पदी (होम)नियुक्ती मिळाली आहे. मात्र माझे कुटुंब मुंबईत राहत असून माझी मुलगी असुरक्षित आहे. त्यामुळे मी मुंबईत बदली करून घेण्यासाठी अनेकदा अर्ज केले होते. 


दोन दिवसांपूर्वी  अनेक  पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यानांच्या  बदल्याची ऑर्डर निघाली. यापूर्वीही तीन ते चार लाँट निघाले होते. परंतु माझी बदली काही झाली नाही. मी सांगली पोलिस कोठडीमध्ये मृत अनिकेत  कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी दत्तक घेतली असून  मला तीन मुलं आहेत  माझी मुलगी सतरा वर्षांची आहे .  माझी  मुले मुंबईत शिक्षण घेत असुन त्यांना रस्त्यावर मुंबई सोडून मी १६ तास प्रवास करून   हिंगोलीमध्ये नोकरी करत आहे. माझ्या नंतर बदली झालेले अधिकारी बदलीच्या ठिकाणी हजर न होता त्यांच्या सोयीनुसार बदल्या दोन -तीन  महिन्यांमध्ये  परत मुंबईमध्ये करण्यात आल्या. मी माझ्या कुटुंबाचा मुंबई मधील खर्च व माझा हिंगोली येथील  वाढीव खर्च यामुळे कर्जबाजारी झालेली आहे .  माझे कुटुंब पूर्णतहा उद्ध्वस्त झालेले असून मी प्रचंड तणावाखाली नोकरी करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . सर माझेकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही .  जर माझी बदली मुंबईत होत नसेल तर माझी बदली गडचिरोली नक्षल विभागात  करण्यात  यावी. जेणे करून. कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास शहिदांना मिळणारे फायदे माझ्या कुटुंबियांना मिळतील आणि  त्यांचे पुनर्वसन होण्यास मदत मिळेल असेही त्यांनी त्या पत्रात नमूद केले.
 
पुढे त्या म्हणाल्या की, 
 शासनाकडून होणारा छळ व पिळवणूक  कायम थांबेल.परंतु आज घडीला  मी प्रचंड तणावाखाली असून.   शेवटचा पर्याय म्हणून मी आपल्याला हा संदेश पाठवत आहे.  माझं कुटुंब पूर्णता उद्ध्वस्त झालेले  आहे.  आणि सर्व सुखांपासून मला प्रशासनांनी वंचित केले असल्याची खंत व्येक्त केली. माझ्या अर्जाचा  विचार केला किंवा नाही याचे उत्तर  मिळणार का असा प्रश्न देखील पाटील यांनी उपस्थीत केला.


माझी १७ वर्षांची मुलगी मुंबईत असुरक्षित आहे. तिच्या जिवितास काही  झाल्यास शासन जबाबदार राहणार  का आणि दत्तक घेतलेल्या मुलींचे पुनर्वसन मला करता येत नाही .त्याचे उत्तर मला मिळाल्यास बरे होईल ?. .अन्यथा माझ्यासमौर पर्याय नसल्याने  कुटुंबासह सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ येत असून  मी अतिशय मानसिक तणावाखाली वावरत आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट मीच आयजीपी व्हटकर सरांना पाठवली असून बदल्या करताना माझ्यावर अन्याय झाला आहे. माझे कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे, तरीही मला न्याय मिळत  नाही. असेच चालू राहिले तर , आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही.

 

- सुजाता पाटील, डी वाय एस पी, हिंगोली.

बातम्या आणखी आहेत...