आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई कशासाठी? पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना सवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात घडलेल्या घटनेचे राजकारण करायचं नव्हते तर घटनेचा कोणताही रिपोर्ट आला नसताना कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची घाई का, असा सवाल वैद्यनाथ कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा  मुंडे यांनी  केला आहे. वैद्यनाथ कारखान्यातील घटनास्थळावर जाण्यास  धनंजय मुंडे यांना मनाई  करण्यात आली नव्हती, याबाबतचे त्यांचे वक्तव्य चुकीचे  असल्याचे पंकजा मुंडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे 

म्हटले आहे.    


घटनेनंतर जखमींना योग्य उपचार देणे, कारखान्यातील यंत्रणेला मनोबल देणे हे प्रथम कर्तव्य असते, जे आम्ही  कारखान्याच्या संचालकांनी चोखपणे बजावण्याचा प्रयत्न केला. जखमी कर्मचाऱ्यांवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी तज्ज्ञ डाॅक्टर्स व गंभीर जखमींना लातूरला हलवण्यासाठी  संचालक व कार्यकर्त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. आर्थिक व्यवस्थेबरोबर त्यांना मानसिक आधार देण्याचे काम आम्ही केले असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. याउलट घटना घडल्यानंतर जखमींना मदत करायची सोडून काहींनी कारखान्याचे घटनास्थळ गाठून, फोटो काढून कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे केलेले वक्तव्य    राजकारणाने बरबटलेले आहे. दुर्घटना हा अपघात आहे की आणखी काय, हे रिपोर्ट आल्यावरच कळेल. कारखान्याची टीमसुद्धा याचा तपास करीत आहे. कुठल्याही अपघाताचे घटनास्थळ हे विविध तपासणीसाठी योग्य राहावे यासाठी सील ठेवणे आवश्यक असते. मी , आमचे संचालक मंडळ व कार्यकर्ते जखमींच्या उपचारांमध्ये व्यग्र असताना राष्ट्रवादीचे काही  नेते व कार्यकर्ते घटनास्थळी जाऊन फोटो काढताना  आढळले.

 

हेही वाचा, 
दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडे यांच्यावर आरोप

 

बातम्या आणखी आहेत...