आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएफएस परीक्षेत वसमतचा निरंजन दिवाकर राज्यात प्रथम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- यूपीएससीने घेतलेल्या आयएफएस परीक्षेत वसमत येथील निरंजन सुभाष दिवाकर याने महाराष्ट्रातून प्रथम तर देशातून तिसरा येण्याचा मान मिळवला आहे.


वसमत शहरातील  शहर पेठ , ब्राह्मण गल्लीतील रहिवासी असलेला निरंजन दिवाकर याचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण वसमत येथील सरस्वती निकेतन हायस्कूलमध्ये झाले असून १२ वी विज्ञान वसमत येथीलच बहिर्जी महाविद्यालयातून पूर्ण केली. लातूर येथील एम. एस. बिडवे कॉलेजमधून इंजिनिअरिंग  ( इलेक्ट्रॉनिक व कम्युनिकेशन) पूर्ण केले. 


यूपीएससीने घेतलेल्या या परीक्षेसाठी ९ फेब्रुवारी रोजी मुलाखत झाली होती. त्यानंतर या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात निरंजन दिवाकर याने राज्यातून प्रथम तर देशातून तृतीय क्रमांक पटकावला.  निरंजन दिवाकर याने यापूर्वी यूपीएससीची परीक्षा दिली होती. परंतु यश न मिळाल्याने २०१७-२०१८ साठी पुन्हा परीक्षा दिली आणि घवघवीत यश मिळवले.

बातम्या आणखी आहेत...