आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात अाॅनलाइन उडीद खरेदीचा फज्जा; एसएमएस मिळूनही शेतकरी रांगेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- राज्य सरकारने यंदाच्या हंगामात उडीद, मूग, साेयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना अाॅनलाइनची सुविधा जाहीर केली हाेती. बीड जिल्ह्यात मात्र या याेजनेचा फज्जा उडाला अाहे. अाॅनलाइन नाेंदणी १० िडसेंबरला बंद हाेण्याच्या दिवशीच हजाराे शेतकऱ्यांना एसएमएस साेडण्यात अाले. एेन नाेंदणी बंद झाल्यानंतर जिल्ह्यातील १२ हमीभाव केंद्रांसमाेर शेतकऱ्यांच्या बैलगाडी ते मिळेल ते वाहन घेऊन माल विक्रीसाठी रांगांच्या रांगा लागल्या अाहेत. राज्य सरकारने गाजावाजा करुन सुरू केलेल्या अाॅनलाइन खरेदी याेजनेचा बीड जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे फज्जा उडाला अाहे. जिल्ह्यातील  बीड, कडा, अाष्टी, पाटाेदा या िठकाणच्या केंंद्रावर दाेन दिवसांपासून एक िकमीपर्यंत रांगेच्या फेऱ्यात शेतकरी यंदाच्या वर्षीही अडकला अाहे.   


राज्य सरकारने शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात उडीद, मूग, साेयाबीन विक्रीसाठी हमीभाव केंद्र सुरू केले.  या केंद्रावर ३ अाॅक्टाेबर २०१७  पासून नाेंदणी सुरू झाली. उडीद नाेंदणी मात्र  १० िडसेंबरला बंद झाली.  दरम्यानच्या काळात बीड जिल्ह्यातील १२ केंद्रांवरील २५ अॅपद्वारे उडदासाठी सुमारे ९ हजार ५९० शेतकऱ्यांनी नाेंदणी केली. त्यापैकी १० डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार ५४७ शेतकऱ्यांच्या उडदाची खरेदी झाली अाहे. तब्बल ८ हजार ४३ शेतकऱ्यांची उडीद खरेदी करण्याचे अाव्हान हमीभाव केंद्रांपुढे अाहे.    


जिल्ह्यातील हमीभाव केंद्रावर नाेंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात  कशा प्रकारे नाेंदणी करायची याची माहिती शेतकऱ्यांना देण्यात केंद्रचालकांचा अधिकचा वेळा द्यावा लागला. शेतकऱ्यांना नियम व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी शासकीय कचेरीचे  उंबरे झिजवावे लागले. त्यानंतर नाेंदणी प्रक्रियेला लागल्यानंतर इंटरनेट व अन्य तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांची नाेंदणी पूर्ण हाेऊ शकत नव्हती. 

 

> ज्या शेतकऱ्यांनी नाेंदणी केली अाहे, त्या शेतकऱ्यांचा माल घेण्याचे अादेश सर्व सबएजंट संस्था तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अधिकाऱ्यांना िदले अाहेत. शेतकऱ्यांना मेसेज उशिरा मिळाले असले तरी त्यांचा माल स्वीकारला जाईल.   
- एस.के. पांडव, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

 

> दोन दिवसांपासून रात्री गेट उघडले जात आहे व माल केवळ उतरून घेतला जात आहे.  ६० टक्के  व्यापाऱ्यांचा माल घेतला जात आहे.   
- लक्ष्मण झोडगे, चऱ्हाट   

 

> उडीद चार पोती आहे. गावातून  टेम्पो करून चार - पाच शेतकऱ्यांनी माल आणला . दोन दिवसांपासून टेम्पो उभा आहे.  ऑफिसात जाऊन ‘माल उतरून घ्या नसता सडकेवर फेका’ असे म्हटल्यावर  काल रात्री १० वाजता माझा माल उतरून  घेतला, पण  तिसऱ्या दिवशीही माप झाले नाही.   

- रामभाऊ बागडे, बेलखंडी 

बातम्या आणखी आहेत...