आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीय सहायकाची ऑडीओ क्लिप व्हायरल करून पंकजा मुंडे यांच्‍या बदनामीचे षडयंत्र!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकाने पैशाची देवाणघेवाण केल्या संबंधीची आॅडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली. ही आॅडिओ क्लिप पूर्णतः बनावट असून पंकजा मुंडे यांना बदनाम करण्‍याचे हे षडयंत्र असल्‍याचा आरोप करत मुंडे यांचे स्‍वीय सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांनी अनोळखी व्यक्तींविरुद्ध परळी पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. 


या विषयी कुलकर्णी यांच्‍याशी संपर्क साधला असता ते म्‍हणाले की, यवतमाळ येथील संजय राठोड हा व्यक्ती कोण आहे हे आपणास माहीत देखील नाही, त्याची कधी भेटही झाली नाही तसेच या क्लिप मधील आवाज माझा नाही, माझ्या नावाचा ऑडीओ क्लिप मध्ये जाणीवपूर्वक उल्लेख करत माझी व त्या माध्यमातून पंकजा मुंडे यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचे स्पष्ट होते. दरम्‍यान अनोळखी  मोबाईल धारकाविरुद्ध कलम ४६८, ४६९, ५०० भा. दं. वि. सह ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...