आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड (सावित्रीबाई फुले साहित्यनगरी)- राजकारण कुठे नाही असे काेणतेही क्षेत्र नाही. राजकारणात अनेक रंग अाहेत ते अाम्ही अनुभवताे हे अामचे दुर्दैव अाहे. पण साहित्यामधून राजकारणाचे रंग दिसतात. जे साहित्य समाजाला शिक्षण देते त्याला रंग कशाला? सर्व प्रकारचे ‘राजकारण’ थांबून समाजात सकारात्मक, समता निर्माण करणारे राजकारण येईल तेव्हाच समृद्ध समाज अाणि देशाची प्रगती हाेईल, असे प्रतिपादन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
बीड शहरातील सावित्रीबाई फुले साहित्यनगरी ( यशवंतराव चव्हाण नाट्यगृह ) येथे रविवारी अाठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाचा समाराेप प्रसंगी कान्होपात्रा विचार मंचावरुन ग्राम विकास मंत्री मुंडे बाेलत हाेत्या. मंचावर संमेलनाध्यक्ष डाॅ. दीपा क्षीरसागर, स्वागताध्यक्ष तथा माजी अामदार उषा दराडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कोषाध्यक्ष डॉ. भास्कर बडे,बीड शाखेचे प्रमुख डॉ. सतीश साळुंके, दादा गाेरे, प्रा. सुशीला माेराळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा सविता गाेल्हार, जिल्हा परिषद सदस्य संताेेष हंगे, भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश पाेकळे, संपादक नामदेव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
ग्रामविकास मंत्री मुंडे म्हणाल्या, ‘राजकारण’ यावरुन प्रगती खुंटत चालली अाहे. साहित्यातून चुकीच्या परंपरा जपण्यापेक्षा ‘संस्कार’ जपणे गरजेचे अाहे. ज्या महिलांचे अस्तीत्व हे त्यांच्या पुरुषांच्या असण्यावरुन ठरवू नये. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमातून महिलांची हेटाळणी हाेते. अशा परंपरा कशासाठी ज्या त्रास देतील ? असाही प्रश्न मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला. स्त्री ही शक्ती अाहे तिनं शक्तीच जपत स्वत:च्या शक्तीनं अन्य स्त्रीला सशक्त करावेत. ज्या ठिकाणी स्त्रीचा सन्मान हाेत नाही तेथे विनाश अटळ असताे याचे उदाहरण द्राेपतींचा अपमान झाल्यावरुन महाभरात घडले अाहे, असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
विचारांचे साैंदर्य गरजेचे
स्त्रीयांच्या अात्मविश्वास वाढीसाठी पुरुषांचे पाठबळ गरजेचे अाहेत त्याच प्रमाणे महिलांनी साैदर्याप्रमाणेच विचारांचे साैंदर्य जपणे गरजेचे अाहे. स्वत: जसे अाहेत तसे जगत व्यवस्थेला प्रश्न विचारुन स्त्री-पुुरुषांमधील समता वाढीसाठी महिला-पुरुषांनी एकत्रीत प्रयत्न करणे गरजेचे अाहे, असे मत संमेलन स्वागताध्यक्ष उषा दराडे यांनी व्यक्त केले.
स्त्रियांनी स्त्रीपण जपावे : विद्या बाळ
स्त्रियांची स्पर्धा ही पुरषांच्या बराेबरची नाही. स्त्रियांनी स्त्रीपण जपावेत. समानता पेक्षा समता असणे गरजेचे अाहे. महिलांनाे अाक्रमतेने काही मिळवता येत नाही. स्त्री अाणि पुरुषाने अापण माणसं हाेण्यासाठी अशा संमेलनातून प्रेरणा घ्यावी तरच समाज व्यवस्था सुधारेल. तसेच पुरुषप्रधान पध्दतीने स्त्री-पुरुषामध्ये निर्माण केलेले भेदाभेद सपुष्टात येतील, असे मत ज्येष्ठ साहित्यिक विद्या बाळ यांनी अाठवे लेखिका साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात कान्होपात्रा विचार मंचावरुन व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.