आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयामध्ये प्रथमच मिळाले पिण्याचे शुद्ध पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - रुग्णालयात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना शुद्ध पिण्याचे पाणी, शुद्ध हवा आणि चांगला निवारा मिळणे आवश्यक असताना येथील सामान्य रुग्णालयात या सर्व सोयींचे बारा वाजले आहेत. मात्र आता, राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीने सतत सहा महिने एकाच मागणीसाठी पाठपुरावा केल्यावर रुग्णालयात प्रशासनाकडून  प्रथमच पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 


येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नवीन इमारत झाली तेव्हापासून म्हणजेच गेल्या १० ते १२ वर्षांपासून टाकीतील पाणी पुरवले जात आहे.  हेच पाणी पिऊन रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक आपली तहान भागवत होते. रुग्णालयात शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. तर गेल्या सहा महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस युवक आघाडीच्या वतीने सामान्य रुग्णालयात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती.  शेवटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांच्या आदेशावरून मंगळवारपासून पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात आले.

 

यावेळी जिल्हा सरचिटणीस बी.डी. बांगर, माधव कोरडे, नगरसेवक खयुम पठाण, मनोज बांगर, केशव शंकट, इरफान पठाण, ठाकरे, अमित काळसरे, ज्ञानेश्वर बांगर, सूरज बांगर, विकास सोनटक्के आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...