आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट म्हणजे साखरेच्या पाकातील गाजर; आर्थिक तरतूद नसताना योजनांच्या घोषणा: राजू शेट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना-  बजेट म्हणजे साखरेच्या पाकात बुडवलेले गाजर असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने सादर केलेले बजेट फसवे असून, तरतूद नसताना अनेक घोषणा यात करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

 

 

शेतमालास हमीभाव, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी आदी मुद्दयांवर भाजपने अपेक्षाभंग केला असून, या सरकारची धोरणे शेतकरी विरोधी आहेत. आर्थिक वर्षाचे बजेट मांडताना केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आरोग्य विमा, कृषी विभागासाठी भरीव तरतूद केल्याचे सांगितले. स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रांनुसार दीडपट हमीभाव देण्याचे म्हटले असले तरी ए-2 आणि सी-2 मधील तरतुदींचा स्पष्ट उल्लेख केला नाही. त्यामुळे याचा लाभ शेतकऱ्यांना कितपत होईल, याबाबत सांशकता आहे. बजेटमध्ये संशोधनासाठी कुठलीही तरतूद नाही. कृषी विद्यापीठांत अनेक जागा रिक्त आहेत. शेतकऱ्यांना तंत्रज्ञान पुरविले जात नाही. केवळ घोषणा करुन विकास कसा साधता येईल, असा सवालही त्यांनी केला.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...