आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला जिवंत गाडल्याची अफवा; खोदकामात निघाले कुत्र्याचे पिल्लू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- उस्मानाबादेत जुन्या शहरातील नागरिकांची रविवारची सकाळ एका निनावी फोनमुळे चांगलीच मनोरंजनात्मक ठरली. मात्र, दुसरीकडे या फोनमुळे पोलिस प्रशासनासह नगरपालिका, महसूल प्रशासनही तब्बल पाच तास वेठीला धरले गेले होते. जिजामाता उद्यानामध्ये रात्रीच्या वेळी अज्ञाताने खोदकाम करून काहीतरी पुरल्याचा फोन आला. सर्व तयारीनिशी केलेल्या खोदकामानंतर खड्ड्यात कुत्र्याचे पिल्लू निघाले आणि एकच हशा पिकला.  
  

उस्मानाबादचे एकेकाळीचे वैभव असलेले जिजामाता उद्यान सध्या अडगळीत पडल्याने सर्व नैतिक-अनैतिक कारभाराचेही ठिकाण बनले आहे. यावर आळा घालण्यासाठी पालिकेने एका कर्मचाऱ्याचीही नेमणूक केली आहे. दरम्यान, शनिवारी (दि.३) रात्रीच्या सुमारास काही अज्ञात लोकांनी उद्यानात खड्डा खोदून काहीतरी पुरले. याबाबत सकाळी ६.३० वाजता शहर पोलिस ठाण्यात निनावी फोनद्वारे माहिती देण्यात आली अन..सगळीच यंत्रणा कामाला लागली. सर्व प्रथम शहर पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. फोनवरील माहितीप्रमाणे उद्यानात खड्डाही खोदल्याचे दिसून आले.  पोलिसांपाठोपाठ नायब तहसीलदार जाधव, पालिकेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी अशी टीम घटनास्थळी दाखल झाली.   सर्व यंत्रणांच्या उपस्थितीत खोदकामाला सुरुवात करण्यात आली.   साधारण दीड फुटांचा खड्डा खोदण्यात आला. तर  आतमध्ये कुत्र्याचे मेलेले पिल्लू निघाले. 

बातम्या आणखी आहेत...