आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड रेल्वेस्टेशनवर सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- महिला प्रवासी, विद्यार्थिनी आणि कार्यालयीन महिला प्रवासी यांच्यासाठी १९ फेब्रुवारी, सोमवारपासून नांदेड रेल्वे स्थानकावर सॅनिटरी नॅपकिनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन, नांदेड यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आली आहे. वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक बेबी प्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा यांच्या उपस्थितीत सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिनचे उद्घाटन करण्यात आले.  


या प्रसंगी वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर, एन. विक्रमादित्य, यांच्यासह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन, नांदेडच्या सदस्या उपस्थित होते.  सॅनिटरी नॅपकिन मशीनबरोबरच सॅनिटरी नॅपकिन नष्ट करण्याची मशीनही येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मशीन एका वेळेस १५ नॅपकिन नष्ट करू शकते. या दोन्ही मशीन नांदेड रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म  क्र. १ वर बसवण्यात आल्या आहेत.   


नेहा रत्नाकर यांनी उपस्थित महिला प्रवासी आणि महिला रेल्वे कर्मचाऱ्यांना या सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशीन कशी वापरायची याचे प्रात्यक्षिक  दाखवले. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिकालज्ञ राभा  यांनी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या व्हेंडिंग मशीनमधून सॅनिटरी नॅपकिन फक्त ५ रुपयांत उपलब्ध होणार आहे.


नांदेड स्थानकावर प्रथमच सुविधा
सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन नांदेड रेल्वे विभागात प्रथमच नांदेड रेल्वे स्थानकावर उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेबरोबरच रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा आणि सन्मानजनक प्रवास पुरवण्यात एक पाऊल पुढे टाकले आहे.  यापूर्वी विभागाने जननी सेवा केंद्र  आणि  शिशू आहार सुविधा नांदेड, पूर्णा, परभणी व औरंगाबाद या रेल्वे स्थानकावर पुरवली आहे.   

बातम्या आणखी आहेत...