आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद- राज्यातील भटक्या विमुक्त समाजातील मुला-मुलींना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या संस्थेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ५ काेटी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ कोटी रुपये मदत देण्याचे जाहीर केले. यमगरवाडी(ता.तुळजापूर) येथे मंगळवारी(दि.१३) महाशिवरात्रीनिमित्त राज्यातील भटक्या विमुक्तांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ही घाेषणा करण्यात अाली. तसेच संस्थेच्या उभारणीसाठी पुढील काळातही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच परिषदेच्या वतीने यमगरवाडी येथे २५ वर्षापासून भटक्या विमुक्त मुला-मुलींसाठी चालविण्यात येणाऱ्या सेवालयात मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी उर्फ सुरेश जोशी, हिंदूत्व अभियानचे प्रणेते लाहीरी गुरूजी, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ.सुवर्णा रावळ, उपाध्यक्ष डॉ.अभय शहापूरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्टकडून संस्थेच्या उभारणीसाठी ५ कोटी रुपये तातडीने देण्याचे जाहीर केले. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री फडणवीस यांनीही भटक्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था महत्त्वाची ठरणार असल्याचा आशावाद व्यक्त करून संस्थेसाठी २ कोटी रुपये देण्याची घोषणा केली. तसेच संस्थेच्या प्रलंबित मागण्यांसाठी नोडल ऑफिसर म्हणून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे सांगितले. तसेच या मागण्यांसंदर्भात सविस्तर प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांना केली.
अायटीअायचे भूमिपूजन
भटके विमुक्त प्रतिष्ठानच्या वतीने तुळजापूर तालुक्यातील सांगवी-मार्डी शिवारात भटक्या विमुक्त मुलांसाठी विश्वकर्मा अौद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यात येत असून, यमगरवाडीत मूलभूत शिक्षण घेतल्यानंतर मुलांना कौशल्यपूर्ण शिक्षण या संस्थेत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस तसेच केंद्रीयमंत्री गडकरी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सकाळी ९ वाजता या प्रशिक्षण संस्थेचे भ्ूमिपूजन करण्यात आले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.