आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोरवारवाडी शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; वडवणीत मुख्याध्यापक अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी- मोबाइल  इंटरनेटवरील अश्लील फोटो दाखवत मागील एक वर्षापासून चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या वडवणी तालुक्यातील ढोरवाडी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावर रविवारी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  


 तालुक्यातील ढोरवाडी येथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंत शाळा आहे. येथे दिगंबर सुधाकर शिंदे (रा. केसापुरी परभणी, ता. बीड) हा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. ८ डिसेंबर २०१७ रोजी दुपारी  तीन  वाजता  दिगंबर याने शाळेतील चौथीच्या वर्गातील तीन मुली व तिसरीच्या वर्गातील एक मुलगी अशा चार विद्यार्थिनींना बरोबर घेऊन शाळेतील एका वेगळ्या खोलीत 
गेला होता. 


खाेलीचा दरवाजा बंद करून मुलींना निर्वस्त्र करून त्यांना मोबाइलवर अश्लील फोटो दाखवले. त्यांना अश्लील बोलून लैंगिक छळ  केला. विद्यार्थिनींनी आरडाओरड करू नये म्हणून त्यांना धमकावले होते. शाळा सुटल्यांनतर मुली घरी गेल्या त्यातील एका मुलीने शाळेत घडलेला प्रकार तिच्या आजीला सांगितला. आजी- आजोबा मिळून तिसरीत शिकणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थिनींकडे गेले. तेव्हा त्यांनीही असाच प्रकार घडल्याचे सांगितले.

 
दरम्यान,  सरपंच बद्रीनाथ व्हरकटे  यांनाही हा प्रकार कळाला त्यांनी मुलीच्या आजोबाला बरेाबर घेऊन  वडवणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मुख्याध्यापक दिगांबर शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तपास वडवणी पोलिस करत आहेत.

 

 विद्यार्थिनींना सुतळीने बांधत असे  
 ढोरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील नराधम मुख्याध्यापक दिंगाबर शिंदे हा शाळेतील चौथी व तिसरीच्या मुलींना शाळेतील बंद खोलीत घेऊन जात बाकड्यांना सुतळीने बांधत असे. अंगावरील कपडे काढून मोबाईलवरील अश्लील फोटो दाखवत होता. 

बातम्या आणखी आहेत...