आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवरायांच्या प्रतिमेची विश्वविक्रमी 3D महारांगोळी पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- शिवजयंतीचे औचित्य साधून तब्बल अडीच एकरात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विश्वविक्रमी थ्रीडी रांगोळी साकारण्यात आली आहे. शिवमहोत्सव समिती आणि अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून ही रांगोळीच्या साकारण्यात आली आहे.

 

 

या रांगोळीसाठी मंगेश निपाणीकर व त्यांच्या टीमने तब्बल 50 हजार किलो विविध रंगाचा वापर केला. तब्बल 72 तासांच्या अथक परिश्रमानंतर ही रांगोळी पूर्ण झाली. यासाठी जिल्हाभरातून 100 स्वयंसेवक आणि रांगोळी कलाकार काम करत होते. यापूर्वी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये 10 हजार चौरस फूट जागेवर रांगोळी साकारण्यात आल्याचा विक्रम नोंद आहे. मात्र, क्रीडा संकुलाच्या मैदानावर साकारण्यात आलेली ही रांगोळी तब्बल अडीच एकर म्हणजेच एक लाख चौरस फूट जागेत साकारण्यात आलेली आहे.

 


गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डमध्ये या रांगोळीची नोंद व्हावी याकरिता सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले निकषही पाळण्यात आलेले असून या रांगोळीची नोंद नक्कीच गिनीज बुकमध्ये होईल असा विश्‍वास आयोजकांना वाटत आहे. ही रांगोळी पाहण्यासाठी लातूरकरांनी मोठी गर्दी होत आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी PHOTOS

बातम्या आणखी आहेत...