आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना \'परळी\'तून विधानसभा निवडणूक लढणारच; पंकजा मुंडेंनी दिली ही प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे. - Divya Marathi
शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे.

बीड- परळी विधानसभेची निवडणूक शिवसेना लढणार आहे. निवडणूक लढवण्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 'मातोश्री'वरुन हाच संदेश घेऊन मी आलो आहे, असे शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे यांनी म्हटले आहे.शिवसेनेच्या या घोषणेनंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची ही लढत आता तिरंगी होईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. परळी हा महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा मतदारसंघ आहे. धनंजय मुंडे याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरुन भाजपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच या मतदारसंघात भाऊ-बहिणीत मोठी लढत पाहायला मिळते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गेल्या निवडणुकीत शिवसेनेने परळी मतदारसंघातून उमेदवार उभा केला नव्हता.

 

 

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी शिवसैनिकांसमोर बोलताना साबणे यांनी ही घोषणा केली. शिवसंपर्क मोहिमेसाठी परळी शहरातील भागवत पॅलेस मिटिंग हॉल येथे घेण्यात आलेल्या बैठकीत शिवसेना येणाऱ्या निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जाणार, यावर चर्चा करण्यात आली.


पुढील स्लाईडवर वाचा पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया

बातम्या आणखी आहेत...