आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेडराजा नगरी सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- राजमाता जिजाऊ यांचा जन्माेत्सव १२ जानेवारी राेजी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दरवर्षी साजरा करण्यात येताे. यंदाही या दिवशी  लाखो जिजाऊ भक्त सिंदखेडराजात दाखल होणार अाहेत. त्यांच्या स्वागतासाठी व या साेहळ्यासाठी मातृतीर्थनगरी सज्ज झाली आहे.  


सकाळी सूर्योदयसमयी राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर राजमाता जिजाऊ यांच्या महापूजेचे आयोजन नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक संघटना, राजकीय, शासकीय अधिकारी यांच्या वतीने महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. महापूजेनंतर राजमाता जिजाऊंच्या दर्शनासाठी रांगा लागतात. या वेळी कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.  जागोजागी सुरक्षा कठडे, राजवाडा परिसरात टेहळणी कॅमेरे लावण्यात आले आहेत.  तसेच याच कार्यक्रमाचे अाैचित्य साधून मराठा समाजातील विवाहोत्सुक युवक-युवतींचा राज्यव्यापी मेळावा अायाेजित करण्यात अाला अाहे. हा मेळावा नि:शुल्क असेल.


‘भाग्यश्री’चा शुभारंभ
माझी कन्या भाग्यश्री जाणीव जागृती अभियानाचा शुभारंभ साेहळा महिला व बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत हाेणार अाहे. राजमाता जिजाऊंचे दर्शन घेऊन त्या  या योजनेच्या चित्ररथाला हिरवी झेंडीही दाखवणार अाहेत.

बातम्या आणखी आहेत...