आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी आढळलेल्या 10 फूट लांब अजगरावर उपचार सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरूर कासार (बीड)- बीड-अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेल्या ऊसाच्या शेतात 10 फूट लांब व 25 किलो वजनाचा अजस्त्र अजगर दि. 8 रोजी घायाळ अवस्थेत आढळून आला होता. त्यास वाईड लाइफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनच्या कार्यकर्त्यांनी पकडून वनविभागाच्या मदतीने तागडगाव जिल्हा बीड येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात दाखल केले. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे, डॉ. निलेश सानप हे उपचार करत आहेत.


        बेलपारा प्रकल्पाच्या पायथ्याशी वडगाव येथील विकास शेळके यांना त्यांच्या ऊसाच्या शेतात दि. 8 रोजी अजस्र अजगर आढळून आला होता. त्यांनी या घटनेची माहिती वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अँड सॅक्टयुअरी असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनी वरून दिली .त्यानंतर तात्काळ सिद्धार्थ सोनवणे व अमोल ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या अजस्त्र अजगरास पकडले. अजगर आजारी असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याने त्यास विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात सिद्धार्थ सोनवणे, अमोल ढाकणे, वनरक्षक विजय केदार, शिवाजी आघाव यांनी दाखल केले. त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे,  डॉ. निलेश सानप उपचार करत आहेत. या अजगराची शुश्रूषा सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे या करत आहेत.

अजगराच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच अजगर बरा होईल. पूर्ण बरा झाल्यानंतर या अजगरास त्याच्या मूळ अधिवासात वन अधिकाऱ्याच्या उपस्थित सोडून देण्यात येईल. असे सर्पराज्ञी प्रकल्पाच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी सांगितले.

      अजगराची हालचाल मंद झालेली आहे, त्याच्या मलमूत्राचाही उग्र वास येत आहे, अन्नही खात नसल्याने  त्याच्या या बाह्यलक्षणावरून त्यास  अमेबिअसिस (Amebiasis)ची लागण झाल्याचे जाणून येत असले तरी त्याचे अचूक निदान करण्यासाठी त्याच्या मलमूत्राची तपासणी करावी लागणार आहे, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे यांनी सांगितले. 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 

बातम्या आणखी आहेत...