आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या स्ट्राँगरूममधून ऐवज चोरी; अंबाजाेगाई जिल्हा-सत्र न्यायालयामधील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- पोलिसांनी विविध प्रकरणांत जप्त केलेल्या वस्तू आणि ऐवज, तोही कोर्टाच्या स्ट्रॉँगरूममधूनच चोरीला गेला आहे. चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री अंबाजोगाई जिल्हा-सत्र न्यायालयाच्या स्ट्राँगरूमच्या खिडकीचा गज कापून प्रवेश करत कपाटातील जप्त मुद्देमालाच्या तीन पेट्या लांबवल्या. न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागील  खिडकीचा गज कापून बुधवारी मध्यरात्री चोरांनी स्ट्राँगरूमच्या दरवाजाचे कुलूप तोडले. यानंतर कपाटामधील ५ पैकी ३ पेट्या लांबवल्या. गुरुवारी सकाळी कार्यालय उघडल्यानंतर स्ट्राँगरूमच्या दरवाजाचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. कोर्टाची तक्रार आल्यानंतरच किती मुद्देमाल चोरीला गेला हे स्पष्ट होईल. 

 

न्यायाधीशांद्वारे पाहणी
बीड जिल्ह्याच्या मुख्य न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी जिल्हा व सत्र कोर्टाच्या स्ट्राँगरूमची पाहणी करून पोलिसांना याप्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले.

बातम्या आणखी आहेत...