आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरमालक, किरायादाराच्या पत्नीच्या गळ्याला चाकू लावत लूट, जिवे मारण्याची दिली धमकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी कुमार बाळनाथ गायकवाड यांच्या कुटुंबातील सदस्यांनी व त्यांचे भाडेकरू देशमुख कुटुंबाने अंबाजोगाईतील सावता माळी चौकातील घरात शुक्रवारी मध्यरात्री थरार अनुभवला. 


दाेनही कुटुंबं साखर झाेपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास तोंडाला काळे फडके बांधून आलेल्या चोरांनी  घरमालक व भाडेकरूच्या पत्नी व मुलांच्या गळ्याला चाकू लावून धुमाकूळ घातला. एवढ्यावरच न थांबता ‘जर पाेलिसांकडे जाल, तर उद्या परत येऊन साऱ्यांना जिवे मारण्याची धमकीही चाेरट्यांनी दिली. 


चाेरट्यांनी दाेनही परिवाराला धमकावत पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबवला. या घटनेत चोरांनी गळ्याला चाकू लावल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली. ‘पैसे कहां है बताओ, नहीं तो मार दूंगा’ असा दम चोरांनी त्यांना दिला.  गायकवाड यांच्याकडे ममदापूर पाटोदा येथील उमाशंकर भैरूसाहेब देशमुख कुटुंबासह  किरायाने राहतात. मध्यरात्री काळे फडके बांधून आलेल्या चार चोरांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी काढून घरात प्रवेश केला. कुमार गायकवाड यांची पत्नी कुसुम यांच्या गळ्याला चाकू लावत जिवे मारण्याची धमकी देत  कानातील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर चोरांनी किरायादार उमाकांत देशमुख यांच्या पत्नी आणि मुलीच्या गळ्याला चाकू लावत पाच ग्रॅमचे मणी मंगळसूत्र काढून घेतले.

बातम्या आणखी आहेत...