आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी पदभार काढला नंतर पगार कापला, संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून शिक्षकाची आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- संस्थाचालकाच्या छळाला कंटाळून उदगीर येथील शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. उदगीर शहराजवळील तुकाराम नाईक प्राथमिक विद्यालयातील शिक्षक केशव जाधव यांनी गुरुवारी सकाळी शाळेत जाऊन कार्यालयाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी जाधव यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत वैयक्तीक छळाला कंटाळून जिवन संपवत असल्याचे म्हटले आहे. शिक्षकाच्या कुटुंबीयांनी त्यांच्या आत्महत्येस संस्थाचालक जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, शिक्षकाने शाळेतच आत्महत्या केल्यामुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.


आरोप जाधव यांच्या पत्नीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी संस्थाचालकाने जाधव यांच्याकडील मुख्याध्यापक पदाचा कार्यभार काढून घेतला होता. तेव्हापासून ते खचले होते. संस्थाचालकाने स्कूल बसचे भाडे देण्यासाठी जाधव यांचा पगार देखील कापला होता. या सर्व घटनांमुळे ते तणावात होते, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. नातेवाईकांनी संस्थाचालकावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. तर संस्थाचालकाने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

बातम्या आणखी आहेत...