आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आडूळ येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आडूळ - पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (१० जून) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पैठण तालुक्यातील देवगाव तांडा येथे घडली. राम पवार असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राम मूळचा देऊळगाव राजा ( जि. बुलडाणा ) येथील रहिवासी आहे. बऱ्याच दिवसांपासून  कामानिमित्त तो आडूळ येथील नातेवाइकांकडे राहत होता.

 

राम व त्याचे आडूळ गावातील ४ ते ५ मित्र रविवारी दुपारी देवगाव तांड्यालगत असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते, परंतु रामला चांगल्या प्रकारे पोहता येत नसल्याने गटकाळ्या खाऊन पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्याने तांड्यावरील व आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन पाचोड पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. त्यानंतर ताबडतोब बीट जमादार शेख गुल्फान, लक्ष्मण बोराडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

बातम्या आणखी आहेत...