आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोदकामात सापडलेल्या मूर्तीच्या ठिकाणी विष्णूचे मंदिर उभारण्याचा भाविकांचा निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी -  कन्हेरवाडी गावाजवळ अंबाजोगाई- परळी रोड शिवारात सोमवार १६ एप्रिल २०१८ रोजी खोदकामाच्या वेळी विष्णूची मूर्ती सापडली होती. या ठिकाणी ग्रामस्थांनी सात दिवस सप्ताहाचे आयाेजन केले.  रविवारी सप्ताह सांगतेच्या दिवशी  बैठक घेऊन  भाविकांनी भगवान विष्णूचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला आहे.  दहा लाख रुपये भाविक देणगी देणार आहेत.   

 

आज सप्ताहाच्या सांगते दिवशी मंदिर उभारणीसाठी  भाविकांनी रोख ७० हजार रुपये  दिले आहेत. भाविकांनी दहा लाखांची देणगी जाहीर केली आहे. या मंदिराच्या उभारणीसाठी ढोक महाराजांनी  पंचवीस हजार रुपये  देणगी देऊन निधी संकलनासाठी सुरुवात केली. 

 

सकाळी नऊ वाजता महिलांची संख्या मोठ्या संख्येने होती.  भागवताचार्य गणेशानंद महाराज गुट्टे, भागवताचार्य गोविंद महाराज मुंडे, बालाजी महाराज फड, वासुदेव महाराज मुंडे,  विश्वास महाराज पांडे, बंडोपंत महाराज ढाकणे, सोपान महाराज गित्ते,  भरत महाराज सोडगीर, बालकीर्तनकार प्रकाश महाराज फड आदी उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...