आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन 16 फेब्रुवारीपासून ‘ट्विटर हँडल’वर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 बीड - अभिव्यक्तीचे जागतिक व्यासपीठ असलेल्या ट्विटरवर ‘मराठी’ला नवी झळाळी मिळावी, तसेच जगभर विखुरलेल्या मराठीजनांना एकत्र आणत दैनंदिन जीवनातील विविध विषयांवर व्यक्त होता यावे, यासाठी ‘आजचा शब्द’ (@marathiword)  या हँडलच्या पुढाकारातून १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान ‘तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१८’ पार पडणार आहे. ‘प्रकट व्हा, अभिव्यक्त व्हा’ असे आवाहन करत मराठी नेटीझन्समधून संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. 


साहित्य संमेलनाचे व्यासपीठ म्हटले की मनातले विचार कथा, काव्य, परिसंवाद, चर्चासत्रातून हजारोंपुढे मांडण्याची संधी ठिकठिकाणच्या लेखकांना प्राप्त होते. 


परंतू, सर्वसामान्य वाचकांच्या अभिव्यक्तीचे काय? त्यांनाही त्यांच्या कविता, कथा, छंद, अनुभव मांडता यायल्या हव्यात. शिवाय ‘ट्विटर’वर इतर भाषांप्रमाणेच मराठी 
भाषेचाही वापर वाढावा, या दुहेरी उद्दिष्टातून ‘आजचा शब्द’ म्हणजेच @marathiword या ट्विटर हॅँडलच्या पुढाकारातून ही ‘ट्विटर मराठी भाषा संमेलन’ ही संकल्पना पुढे आली. सन २०१६ मध्ये जानेवारी महिन्यात पिंपरी चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी संमेलन पार पडले. याच पार्श्वभूमीवर १५ ते १८ जानेवारी २०१६ या तीन दिवसांत पहिले ट्विटर मराठी भाषा संमेलन पार पडले. यात प्रथितयश लेखक, कवी, समीक्षकही या संमेलनात सहभागी झाले होते. 


दुसरे   ट्विटर मराठी भाषा संमेलन  ३ ते ६  
फेब्रुवारी २०१७ दरम्यान पार पडले. या संमेलनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. आता यंदा १६ ते १८ फेब्रुवारीदरम्यान तिसरे तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन २०१८’ पार पडणार आहे. या संमेलनात ट्विटरकऱ्यांना @marathiword या हँडलच्या साथीने कथा, कविता, ब्लॉग, छंद, पाककृती असे हॅशटॅग वापरत व्यक्त होता येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने आपल्या ‘मायबोली’ला जागतिक पटलावर घेऊन जाण्यासाठी हे तिसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन संमेलन खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे.  त्यामुळे साहित्यिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

अनुभवाचे भांडार खुले करण्याची संधी
स्वत:च्या किंवा आवडत्या कवींच्या कविता, कथा, ब्लॉग, आवडती पुस्तके, पाककृती, अनुभव आदी साहित्य हॅशटॅगच्या माध्यमातून नेटकऱ्यांना या संमेलनात मांडता येणार आहे. या संमेलनात सहभागी होत आपल्या ज्ञान, माहिती, अनुभवाचे भांडार जागतिक व्यासपीठावर खुले करण्याची संधी मराठी नेटकऱ्यांना असणार आहे. 

 

 

साहित्याची स्मरणिका 
marathiword हे ट्विटर हँडल संमेलनाच्या आठवणी व प्रमुख साहित्य एकत्र करत स्मरणिका प्रकाशित करणार आहे. स्वत:चे साहित्य, लेखन हे हॅशटॅगच्या माध्यमातून ट्विट करायचे आहे. 

बातम्या आणखी आहेत...